शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
5
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
6
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
7
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
8
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
9
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
10
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
11
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
12
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
13
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
14
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
15
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
16
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
17
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
18
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
19
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
20
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा

हम भी किससे कम नही ! श्यामराव कासट: जन्मत: अपंगत्वावर केली मात; इच्छाशक्तीची कमाल

By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST

सोलापूर: (विलास जळकोटकर)

सोलापूर: (विलास जळकोटकर)

दैव फिरले जरी मजवरी
रुसलो ना कधी तयावरी
घेवोनि भरारी दाविले जगा
हम भी किससे कम नही
दैवाने पाठ फिरवून दोन हात आणि पायांनी अपंगत्व दिले तरी त्यावर मात करुन कसे जगता येते, समाजात ताठ मानेने फिरु शकतो याचे आदर्श उदाहरण आज जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने श्यामराव कासट यांच्या रुपाने पाहावयास मिळाले. त्यांची जिद्द, चिकाटी आणि इच्छाशक्ती इतरांनाही नेहमीच प्रेरणादायी ठरणार आहे.
श्यामराव कासट.. साठीच्या उंबरठय़ावर असलेले व्यक्तिमत्त्व.. जन्मत: दोन्ही हात आणि पायांनी अपंग.. वडील बिरदीचंद कासट आणि आई कमलादेवी यांनी यावर मात करण्यासाठी अनेक कष्ट घेतले. मनगटापासून दोन्ही हात उलट्या दिशेने वाकलले.. पायही मुडपलेल्या अवस्थेत. लहानपणी वेदना व्हायच्या पण जिद्द बसू देत नव्हती. श्यामराव यांनी आपल्या गतकाळच्या गोष्टींना उजाळा दिला. शाळेत जाताना वाकड्या हाताने मी लिहिणार कसा? असा प्रश्न निर्माण झाला. र्शाविका आर्शमच्या विद्युलता शहा यांनी माझी जबाबदारी घेतली आणि महाविद्यालयापर्यंत मजल मारीत दयानंद महाविद्यालयात 1977 साली बी. कॉम. ची पदवी घेतली.
सर्वसामान्यांसारखेच आपणही सन्मानाने जगू शकतो हे दाखवायचे, या इर्षेने श्यामरावांनी 1979 साली वडिलांच्या कापड व्यापारात उडी घेतली. जाम मिल आणि नरसिंग गिरजी मिलचे अधिकृत विक्रेते म्हणून जबाबदारी स्वीकारली. या व्यवसायाच्या निमित्ताने स्वत: ड्रायव्हिंग शिकून भारतभर भ्रमण केले. 1985 सालात एमआयडीसीमध्ये टर्किश टॉवेलची फॅक्टरी टाकली. 1993 मध्ये आर्थिक स्थिती ढासळली, फॅक्टरी बंद करावी लागली. संघर्षाला तोंड देत होजिअरी, लाईमस्टोनचा व्यवसाय सुरु केला. त्यानंतर सम्राट चौकात जनरल स्टोअर्स टाकले. पुन्हा जम बसत गेला. 1998 साली बांधकाम व्यवसायाला लागणारे दुर्गा स्टील नावाने स्टील, सिमेंटचा व्यवसाय सुरु केला. तो आजतागायत मुलगा नवलसमवेत ते सांभाळताहेत.
सामाजिक कार्यात उडी
2004 साली पीपल्स रिपब्लिकन पार्टीत श्यामराव कासटांनी काम सुरु केले. आजही ते पक्षाचे प. महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत. 2012 मध्ये रोटरी क्लब ऑफ एअरपोर्टमध्ये अध्यक्षपदाची धुराही सांभाळली. अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले आणि ते तडीस नेले. सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून त्यांना मदत करण्याचे धोरण अवलंबून आजतागायत ते सुरु ठेवले आहे. रोटरीचे काम करताना शांता येळंबकर यांनी केलेल्या अतिव सहकार्यामुळेच समाजासाठी काही तरी करता आल्याची भावना श्यामराव कासटांनी आवर्जून व्यक्त केली.
सहचारिणीची साथ
अंपगत्वामुळे लग्न कसे होणार अशी आई-वडिलांना चिंता होती, मात्र ती चुटकीसरशी मिटली. ‘गुलाब’च्या रुपाने सोज्वळ, सालस पत्नी मिळाली. माझ्या व्यंगापेक्षा तिने माझ्या कर्तृत्वावर भरवसा ठेवला. आज चार मुली दिल्याघरी नांदताहेत. मुलगा व्यवसायात माझ्याबरोबर साथ देतोय. विरेनच्या रुपाने एक गोंडस नातूही अंगाखांद्यावर बागडतोय. यापेक्षा वेगळे सुख काही असू शकते? असा श्यामराव कासटांनी साधा सरळ प्रश्न केला.
--------
कोट..
जन्मत: अपंगत्व असले तरी स्वत:ला कधीच अपंग समजले नाही. मला कौटुंबिक आणि मित्रपरिवाराची सक्रिय साथ मिळाल्याने वयाची 57 वर्षे कधी आनंदाची तर कधी खडतर प्रवास करीत जगलो. समाजातील माझ्यासारख्या अनेक अपंगांनी स्वत:ला कधीच दुबळे मानू नये. आयुष्याच्या वाटेवर कधीच खचून जाऊ नका. आयुष्य सुंदर आहे, मनसोक्त त्याला जगा. हीच अपेक्षा.
- श्यामराव कासट, सोलापूर