शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

आम्हाला कोरोनाची नव्हे, हल्ल्यांची भीती, एम्सच्या डॉक्टरांचे गृहमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 05:18 IST

एम्सच्या डॉक्टरांचे गृहमंत्र्यांना पत्र : आरोग्य सेवकांवरील हल्ले रोखणारे विधेयक अमलात आणा

नवी दिल्ली : आम्हाला कोरोनाची नव्हे, तर दररोज होणाऱ्या हल्ल्यांची भीती आहे, या शब्दांत कैफियत मांडून दिल्लीतील एम्सच्या निवासी डॉक्टर संघटनेने आारोग्यसेवकांवरील हल्ले रोखणारे विधेयक अमलात आणण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केली आहे. निवासी डॉक्टर संघटनेने अमित शहा यांना लिहीलेल्या पत्रात देशभरातील सात वेगवेगळ््या घटनांचाही उल्लेख केला आहे. डॉक्टरांवर होणारे हल्ले, दगडफेक, त्यांना दिली जाणारी वाईट वागणूक, अपमान आदी घटना महामारीच्या काळात घडल्या.

मोरादाबाद, लोकनायक हॉस्पीटल, सुरत, सफदरजंग, भरतपूर, हैदराबाद आणि भोपाळ येथील सात घटनांचा आवर्जुन उल्लेख करण्यात आला आहे.आरोग्यसेवकांवरील हल्ले तसेच वैद्यकीय संस्थांचे नुकसान प्रतिबंधक विधेयक अंमलात आणून संकटातून सोडवावे, अशी विनंती डॉक्टरांनी केली आहे. निवासी डॉक्टर संघटनेने या विधेयकात दुरुस्तीचीही मागणी केली आहे.

डॉक्टर, परिचारिकांसह इतर आरोग्यसेवकांच्या सुरक्षेसाठी विशेष मार्गदर्शकतत्वे गृह मंत्रालयाने जारी केलेले असतानाही देशभरात हिंसक घटना घडत आहे. वैद्यकीय व्यवसायातील कर्मचारी म्हणून आम्हाला कोरोनाच्या संसगार्ला घाबरत नाही, पण आम्हाला हल्ल्यांची आणि सततच्या अपमानास्पद वागणुकीची नक्कीच भिती आहे, असे या पत्रात नमूदआहे.देशात अनेक ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांवर झाले हल्लेरोजी मोरादाबाद येथे डॉक्टरांचा चमू आणि कर्मचाºयांवर हल्ला झाला होता. त्यापूर्वी १४ एप्रिलला लोकनायक रुग्णालयातील महिला डॉक्टरशी रुग्णाने वाईट वर्तणूक केली होती. त्याच दिवशी हैदराबाद येथील एका युवा डॉक्टरवर संशयित रुग्णाच्या कुटुंबियांनी हल्ला केला होता.रोजी सफदरजंग येथील दोन डॉक्टर भाजी आणायला गेले असताना एका ४२ वर्षांच्या व्यक्तीने त्यांना मारहाण केली होती. त्याच दिवशी रात्रीच्या वेळी रुग्णालयातून परत येणाºया दोन ज्युनियर डॉक्टरला भोपाळ पोलिसांनी दंड्याने मारहाण केली होती.च्भरतपूरमध्येही सरकारी रुग्णालयातील एका डॉक्टरला पोलिसांनी व उपजिल्हाधिकाºयाने वाईट वागणूक दिली होती, तर सुरतमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाºया डॉक्टरवर शेजाºयांनी बहिष्कार घातला होता.च्विशेष म्हणजे या सर्व घटना एप्रिल महिन्यातच घडलेल्या असून, त्यांचा विशेष उल्लेख पत्रात करण्यात आला आहे.

टॅग्स :Home Ministryगृह मंत्रालयdoctorडॉक्टरAIIMS hospitalएम्स रुग्णालयcorona virusकोरोना वायरस बातम्या