गुजरात, राजस्थान, जम्मू आणि काश्मीर, हरयाणा आणि चंदीगडसह केंद्रशासित प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये उद्या २९ मे रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून 'ऑपरेशन शील्ड' नावाचा नागरी संरक्षण सराव आयोजित केला जाईल. संभाव्य युद्ध किंवा आपत्तीच्या बाबतीत नागरी संरक्षणाच्या तयारीची चाचणी घेण्यासाठी हे मॉक ड्रिल आयोजित केला जात आहे.
उद्या पंजाबमध्ये कोणताही मॉक ड्रिल होणार नाही. हा सराव ३ जून रोजी राज्यात आयोजित केला जाईल.
इलॉन मस्क यांना नकार देणे 'अॅपल'ला महागात पडले; आयफोन वापरकर्त्यांना ही खास सेवा मिळत नाही
मॉक ड्रिल दरम्यान, विविध आपत्कालीन परिस्थितींचा सराव केला जाईल, यामध्ये नागरिक, प्रशासन आणि सुरक्षा संस्थांच्या समन्वय क्षमतेची चाचणी घेतली जाईल. हा सराव यशस्वी करण्यासाठी गृह मंत्रालयाने जिल्ह्यांना सविस्तर सूचना जारी केल्या आहेत.
मॉक ड्रीलमध्ये काय असणार?
नागरी प्रशासनाला विविध कामांमध्ये मदत करण्यासाठी नागरी संरक्षण वॉर्डन, स्थानिक प्रशासन कर्मचारी आणि NCC, NSS, NYKS, भारत स्काउट्स आणि गाईड्स सारख्या युवा स्वयंसेवकांना त्यांच्या सेवांसाठी बोलावले जाईल.
हवाई हल्ला आणि ड्रोन हल्ल्याचा सराव
हा सराव शत्रूची विमाने, ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या परिस्थितीचे अनुकरण करेल. या दरम्यान, हवाई दल आणि नागरी संरक्षण नियंत्रण कक्षांमधील हॉटलाइन सक्रिय केल्या जातील आणि हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन देखील वाजवले जातील.
नागरी भागात रात्री ८.०० ते ८.१५ पर्यंत ब्लॅकआउट असेल. यासाठी आधीच माहिती दिली जाईल. जेणेकरून लोक वेळेवर दिवे बंद करू शकतील आणि सायरन तपासता येतील.
मॉक ड्रिल दरम्यान, जर एखाद्या लष्करी तळावर शत्रूच्या ड्रोनने हल्ला केला तर काय करावे याचा सराव केला जाईल. या दरम्यान, स्थानिक प्रशासनाच्या मदतीने स्टेशन कमांडर कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी बचाव सराव करेल. यामध्ये, २० लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचे सिम्युलेशन केले जाईल.