शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

प्रियंका गांधींनी केले गृहमंत्री अमित शाह यांचे कौतुक; २५ दिवसांत मागणी पूर्ण केल्याबद्दल मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 08:47 IST

केंद्रीय गृहमंत्री मित शाह यांनी आश्वासन पूर्ण केल्याबद्दल वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी यांनी आभार मानले आहेत.

Priyanka Gandhi on Amit Shah: काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वड्रा यांनी गृहमंत्री अमित शहा यांचे कौतुक केले आहे. एवढेच नाही तर अमित शाह यांनी अवघ्या २५ दिवसांत आश्वासन पूर्ण केल्याबद्दल वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी यांनी आनंद व्यक्त केला. प्रियंका गांधी यांनी ४ डिसेंबर रोजी संसदेच्या अधिवेशनादरम्यान शाह यांची भेट घेतली होती आणि वायनाडमधील विनाशकारी भूस्खलनामुळे झालेल्या नुकसानीला गंभीर नैसर्गिक आपत्ती घोषित करण्याची मागणी केली होती. सोमवारी गृहमंत्र्यांनी त्यांची मागणी मान्य केली आणि वायनाड भूस्खलन ही गंभीर नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केली.

वायनाडच्या खासदार आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे एक्स पोस्टमधून आभार मानले आहेत. गृह मंत्रालयाने वायनाड दुर्घटनेला गंभीर नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केले आहे. सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करत प्रियंका गांधी यांनी गृह मंत्रालयाचे आभार मानले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे लोकांच्या पुनर्वसनात मोठी मदत होईल, असे प्रियांका गांधी यांनी म्हटलं.

"अमित शाह यांनी अखेर वायनाड दुर्घटनेला गंभीर नैसर्गिक आपत्तीचा दर्जा दिला याचा मला खूप आनंद आहे. हे निश्चितपणे पुनर्वसनाची गरज असलेल्यांना मदत करेल आणि निश्चितपणे योग्य दिशेने एक पाऊल मानले जाईल. आता या कामासाठी वेळेत पैसे वाटून दिल्यास आम्ही खूप आभारी राहू," असं प्रियांका गांधी यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं.

काही दिवसांपूर्वी वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली केरळच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्याचबरोबर भूस्खलनग्रस्तांना केंद्र सरकारकडूनही मदत मागण्यात आली होती. सध्या वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांकडे कोणतीही मदत यंत्रणा उरलेली नाही. केंद्राने अनेक पावले उचलली पाहिजेत. मानवतावादी दृष्टिकोनातून या प्रकरणावर राजकारण करू नये आणि तेथील लोकांना मदत करावी, असे आवाहन प्रियंका गांधी यांनी केले होते.

दरम्यान, वायनाडमध्ये २९ जुलैच्या रात्री अनेक ठिकाणी दरड कोसळली होती. मुंडक्काई, चुरलमला, अट्टामाला आणि नूलपुझा भूस्खलनामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. सरकारी आकडेवारीनुसार, भूस्खलनामुळे २०० हून अधिक मृत्यू झाले, अनेक जखमी झाले आणि हजारो बेघर झाले.

केरळच्या इतिहासातील ही सर्वात भीषण नैसर्गिक आपत्ती असल्याचे म्हटलं जात आहे. केरळमधल्या आपत्तीसाठी २०२४-२५ मध्ये ३८८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. १४५.६० कोटी रुपयांचा पहिला हप्ता ३१ जुलै रोजी आणि १४५.६० कोटी रुपयांचा दुसरा हप्ता १ ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आला. 

टॅग्स :wayanad-pcवायनाडPriyanka Gandhiप्रियंका गांधीAmit Shahअमित शाह