शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

वायनाडमध्ये प्रियंका गांधी यांच्याविरोधात कोण लढणार? उमेदवार कोण असणार, डावे संभ्रमात  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 16:57 IST

Wayanad Lok Sabha Constituency By Election: काँग्रेसने वायनाडमधून प्रियंका गांधी यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्याविरोधात कुणाला उमेदवारी द्यायची यावरून केरळमधील सत्ताधारी पक्ष असलेली डावी आघाडी संभ्रमात आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमधील रायबरेली आणि केरळमधील वायनाड या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या दोन्ही मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर राहुल गांधी यांनी नियमानुसार वायनाडमधील खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे वायनाडची लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. आता काँग्रेसने वायनाडमधून प्रियंका गांधी यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, प्रियंका गांधी यांच्याविरोधात कुणाला उमेदवारी द्यायची यावरून केरळमधील सत्ताधारी पक्ष असलेली डावी आघाडी संभ्रमात आहे. या जागेवर सीपीआयला उमेदवार उभा करायचा आहे. मात्र इथून कुणाला उमेदवारी द्यायची, याबाबतचा निर्णय घेणं पक्षासाठी संभ्रम वाढवणारं ठरत आहे. लोकसभा निवडणुकीत वायनाडमध्ये राहुल गांधी यांच्याविरोधात डाव्या पक्षांनी एनी राजा यांचा दारुण पराभव झाला होता. 

राष्ट्रीय पातळीवर सीपीआय इंडिया आघाडीचा पक्ष आहे. मात्र केरळमध्ये या डाव्या पक्षांचा काँग्रेस हा मुख्य विरोधी पक्ष आहे. लोकसभा निवडणुकीत सीपीआयच्या नेत्या एनी राजा यांनी राहुल गांधींना आव्हान दिले होते. मात्र त्यांचा ३ लाख ६४ हजार मतांनी पराभव झाला होता. पण २०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये राहुल गांधींचं मताधिक्य मात्र घटलं होतं. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सीपीआयचे सरचिटणीस डी. राजा यांची पत्नी एनी राजा यांनी पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये सांगितले होते की, मी वायनाड येथून निवडणूक लढवण्यास इच्छुक नव्हते. मात्र बिनॉय विस्वान यांच्या सांगण्यावरून मी निवडणूक लढले होते. दरम्यान, एनी राजा ह्या आता प्रियंका गांधी यांच्याविरोधात पोटनिवडणूक लढवण्यास इच्छुक नाही आहेत. त्यामुळे आता येथून निवडणूक लढवण्यासाठी नवा उमेदवार शोधण्याची जबाबदारी सीपीआयच्या केरळ कार्यकारिणीवर येऊन पडली आहे. दुसरीकडे वायनाडमधील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफला ही जागा आपल्याकडे राखण्याबाबत पूर्ण विश्वास आहे. वायनाडमध्ये केवळ प्रियंका गांधी यांच्या विजयाचं अंतर किती राहील याबाबतच उत्सुकता आहे, असा त्यांचा दावा आहे.   

टॅग्स :wayanad-pcवायनाडRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसKeralaकेरळINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी