शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'आम्ही 23, 24, 25, 26 जुलै रोजी चार अलर्ट जारी केले', वायनाड भूस्खलनावर शाह स्पष्ट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 15:54 IST

Wayanad Landslide : 'केंद्र सरकारने सात दिवस आधीच NDRF ची 9 पथके केरळला पाठवली होती. केरळ सरकारने वेळेवर काहीच उपाययोजना केल्या नाही.'

Amit Shah on Wayanad Landslide : केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलनामुळे आतापर्यंत सूमारे 158 लोकांचा मृत्यू झाला असून, शेकडो लोक बेपत्ता आहेत. या घटनेचा मुद्दा बुधवारी(दि.31) राज्यसभेतही उपस्थित करण्यात आला. त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी सरकारने उचललेल्या पावलांची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. तसेच, केरळ सरकारला धारेवर धरले. शाह म्हणाले की, केंद्र सरकारने 23 जुलै रोजीच एनडीआरएफची 9 पथके केरळला पाठवली होती, पण केरळ सरकारने लोकांना स्थलांतरित करण्यासाठी काहीच केले नाही.

केरळ सरकारने वेळीच कारवाई केली नाही: अमित शाहसभागृहात बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी सुरुवातीला भूस्खलनामुळे प्राण गमावलेल्या कुटुंबांप्रती शोक व्यक्त केला. तसेच, या आपत्तीबाबत काही माहिती सभागृहात सांगितली. अमित शाह म्हणाले की, '23 तारखेलाच एनडीआरएफच्या 9 टीम केरळला पाठवल्या होत्या. केरळ सरकारला केंद्र सरकारने 23 जुलै रोजीच पूर्व इशारा दिला होता. केरळ सरकारला 23, 24 आणि 25 जुलै रोजीही पूर्वसूचना देण्यात आली होती. 26 जुलैला 20 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडेल, भूस्खलन होऊ शकते, चिखलही येऊ शकतो आणि काही लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असे आम्ही आधीच सांगितले होते. केरळ सरकारने काय केले? लोकांचे स्थलांतर केले नाही. स्थलांतर केले असते, तर इतक्या लोकांचा जीव गेला नसता.'

'कोणतेही राज्य एसडीआरएफमध्ये 10 टक्के रक्कम स्वतःच्या मर्जीनुसार खर्च करू शकते. आपत्तीच्या नावाखाली 10 टक्के खर्च केला तर कोणी विचारत नाही, पण 90 टक्के रक्कम मार्गदर्शक तत्त्वांनुसार खर्च करावी लागते. पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील केरळ सरकारला 23 जुलै रोजीच संभाव्य भूस्खलनाबाबत इशारा देण्यात आला होता, पण सरकारने काहीच केले नाही. ही वेळ राजकारण करण्याची नाही. केरळच्या जनतेच्या आणि तिथल्या सरकारच्या पाठीशी उभं राहण्याची ही वेळ आहे. नरेंद्र मोदी सरकार केरळच्या लोकांसोबत आणि तिथल्या सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे', असेही त्यांनी यावेळी म्हटले. 

वायनाड भूस्खलनावर राहुल गांधी काय म्हणाले?

'वायनाडमध्ये घडलेली दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे. सैन्य चांगले काम करत आहे. अशा कठीण प्रसंगी वायनाडच्या लोकांच्या पाठिशी उभे राहणे गरजेचे आहे. मी सरकारला तात्काळ मदतीची विनंती करतो. वायनाडमध्ये दुस-यांदा अशी दुर्घटना घडली आहे. 5 वर्षांपूर्वीही अशीच घटना घडली होती. या भागात पर्यावरणीय समस्या आहे, म्हणून याकडे लक्ष दिले पाहिजे आणि जे काही हाय-टेक उपाय केले जाऊ शकतात, ते करावे', अशी मागणी वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी यांनी यावेळी केली.

टॅग्स :Amit Shahअमित शाहKeralaकेरळlandslidesभूस्खलन