शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

अफगाणिस्तानच्या मुलीने पाठवले पाणी, त्याच पाण्याने योगींच्या हस्ते रामललाचा अभिषेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 18:51 IST

अफगाणिस्तानातील एका मुलीने रामजन्मभूमीवर अर्पण करण्यासाठी काबुल नदीचे पाणी पाठवले होते, त्याच पाण्याने अभिषेक करण्यात आला.

अयोध्या: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी अफगाणिस्तानमधील काबूल नदीच्या पाण्याने रामजन्मभूमीचा अभिषेक केला. हे पाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अफगाणिस्तानातील एका मुलीने पाठवले होते. या पाण्याने प्रभू रामाचे जन्मस्थान पवित्र करावे, अशी विनंती तिने पंतप्रधानांना केली होती. त्यानुसार योगींनी या पाण्याने रामजन्मभूमीचा अभिषेक केला. यावेळी योगींनी भगवान श्री राम आणि हनुमानगडीचे दर्शन घेतले. तसेच, 3 नोव्हेंबरला होणाऱ्या दीपोत्सवाच्या तयारींचा आढावाही घेतला.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, त्या अफगाणी मुलीच्या आणि कुटुंबाच्या भावनेचा आदर करत मी हे पाऊल उचलत आहे. अफगाणिस्तानातील अशांततेनंतरही लोक आपली संस्कृती विसरलेले नाहीत. काबूलमधील मुलीने पाणी पाठवले हे तर कौतुकास्पद आहेच. सध्या काबूलमध्ये भीषण परिस्थिती आहे, अशा परिस्थितीतही त्या मुलीने हे पाणी पाठवले आहे, तिच्या कुटुंबाला शुभेच्छा.

यंदा कशी असेल अयोध्यातेल दिवाळी ?या वर्षी दिपोत्सवाची सुरुवात 1 नोव्हेंबरला होईल आणि शेवट 5 नोव्हेंबरला होईल. अयोध्येत रामजन्मभूमीपासून 15 किलोमीटरचा परिसरात दिवे आणि रांगोळ्यांनी सुशोभित केला जाईल. यंदा 9 लाख दिवे लावण्याची तयारी सुरू आहे.  पहिल्या दिवशी गायक अनुप जलोटांचा कार्यक्रम असेल. त्याच दिवसी जनकपूर नेपाळची रामलीला असेल. यंदा परदेशी रामलीलांमध्ये श्रीलंका आणि नेपाळच्या रामलीलेचे सादरीकरण होईल. तर, जनकपूर, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, पश्चिम बंगाल, असाम, दिल्ली आणि अयोध्येतील रामलीलांचे मंचन होईल. यासह इतर दिवशीही मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याAfghanistanअफगाणिस्तानyogi adityanathयोगी आदित्यनाथ