शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पाणीप्रश्न पेटला... ‘कावेरी’ प्रश्नी आज कर्नाटक बंदची हाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 06:07 IST

संपूर्ण कर्नाटकात बंद पुकारण्यात आला असून ते महामार्ग, टोल नाके, रेल्वे सेवा आणि विमानतळ बंद करण्याचा प्रयत्न करतील

लाेकमत न्यूज नेटवर्कबेंगळुरू : कावेरी नदीचे पाणी तामिळनाडूला हस्तांतरणाच्या निषेधार्थ कर्नाटक रक्षा वेदिके आणि विविध शेतकरी संघटनांनी  शुक्रवारी पुकारलेल्या 'कर्नाटक बंद'च्या पार्श्वभूमीवर राज्याच्या विशेषतः दक्षिण भागात जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. कर्नाटक रक्षा वेदिके, कन्नड चालवली (वताल पक्ष) आणि विविध शेतकरी संघटनांची सर्वोच्च संघटना असलेल्या 'कन्नड ओक्कुटा' यासह कन्नड संघटनांनी राज्यभर बंदची हाक दिली आहे. दरम्यान, राज्य परिवहन विभागाने सरकारी परिवहन महामंडळांना सेवा सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

संपूर्ण कर्नाटकात बंद पुकारण्यात आला असून ते महामार्ग, टोल नाके, रेल्वे सेवा आणि विमानतळ बंद करण्याचा प्रयत्न करतील. शहरातील टाऊन हॉल ते फ्रीडम पार्कपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून त्यात सर्व स्तरातील लोक सहभागी होतील, असा दावा बंदच्या आयोजकांनी केला. विरोधी पक्ष भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांनीही बंदला पाठिंबा दिला आहे. हॉटेल, ऑटोरिक्षा, कार चालकांच्या संघटनांनीही बंदला पाठिंबा दिला आहे. संपाला पाठिंबा असल्याचे कर्नाटक प्रदेश प्रायव्हेट स्कूल असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले. कावेरीचे पाणी तामिळनाडूला देण्याच्या विरोधात कावेरी खोऱ्यातील मांड्या येथे गुरुवारी काही कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांचे आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारने तामिळनाडूबाबत मवाळ भूमिका स्वीकारली असून या प्रकरणाकडे योग्य लक्ष दिले जात नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Kaveri water disputeकावेरी पाणी वादKarnatakकर्नाटक