शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांत डिझेलऐवजी पाणी; मध्य प्रदेशातील प्रकार; सर्व वाहने पडली बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 09:25 IST

पाणीमिश्रित डिझेलची माहिती मिळताच नायब तहसीलदार आशिष उपाध्याय, अन्न व पुरवठा अधिकारी आनंद गोरे आणि अन्य अधिकाऱ्यांनी पेट्रोल पंपाची तपासणी करून तो तात्काळ सील केला. 

रतलाम : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या ताफ्यातील १९ इनोव्हा गाड्यांमध्ये एका पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यात आले. तिथून काही अंतर गेल्यानंतर एकामागून एक या सर्व गाड्या बंद पडल्या. या अनपेक्षित घटनेने सर्वजण चक्रावले. या गाड्यांमध्ये भरलेल्या डिझेलमध्ये पाणी मिसळल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे हा पेट्रोल पंप सील करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

गुरुवारी रात्री इंदूरहून मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा  रतलामला जात होता. यावेळी डोसीगाव परिसरातील भारत पेट्रोलियमच्या शक्ती फ्युएल्स या पेट्रोल पंपावरून त्या गाड्यांमध्ये डिझेल भरण्यात आले. तिथून काही अंतर पुढे गेल्यानंतर या गाड्या बंद पडल्या.

पाणीमिश्रित डिझेलची माहिती मिळताच नायब तहसीलदार आशिष उपाध्याय, अन्न व पुरवठा अधिकारी आनंद गोरे आणि अन्य अधिकाऱ्यांनी पेट्रोल पंपाची तपासणी करून तो तात्काळ सील केला. 

रतलाममध्ये डॉ. मोहन यादव उद्योग, कौशल्य आणि रोजगार या विषयावरील एका कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांच्या ताफ्यातील गाड्यांबाबत जो प्रकार घडला, त्याचीच चर्चा मध्य प्रदेशमध्ये होती. 

वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल सादर करणार

पाणीमिश्रीत डिझेल भरल्याने १९ इनोव्हा गाड्या बंद पडल्याने  इंदूरहून गुरुवारी रात्रीच दुसऱ्या वाहनांची व्यवस्था मुख्यमंत्री ताफ्यासाठी करण्यात आली. त्यानंतर ही वाहने रतलामला रवाना झाली. डिझेलमध्ये पाणी कसे मिसळले गेले, याबाबतचा अहवाल सादर करण्यात येईल. त्यानंतरच योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे उपाध्याय यांनी सांगितले.

पंपातील डिझेलच्या टाकीत पाणी झिरपले का?

तिथून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांपैकी १९ गाड्यांमध्ये १० ते २० लिटर डिझेल भरण्यात आले होते. याच पंपावरून एका ट्रकमध्ये २०० लिटर डिझेल भरले होते. तोही थोडे अंतर पुढे गेल्यानंतर बंद पडला. 

या प्रकारामुळे भारत पेट्रोलियमचे क्षेत्रीय व्यवस्थापक श्रीधर यांना बोलावण्यात आले. त्यांनीही तपासणी केली. सध्या पाऊस सुरू असून त्यामुळे पेट्रोल पंपातील डिझेलच्या टाकीत पाणी झिरपले असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशChief Ministerमुख्यमंत्रीcarकारPetrol Pumpपेट्रोल पंप