शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

...तर पंतप्रधान मोदी तुमचा फोटो रिट्विट करतील; देशवासीयांना केलं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 15:31 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी चांद्रयान-2 चं लँडिंग इस्रोमध्ये जाऊन ६० विद्यार्थी आणि शास्त्रज्ञांसमवेत बघणार आहेत.

ठळक मुद्दे'चांद्रयान-2' आज मध्यरात्री १.३० ते २.३०च्या सुमारास चंद्रावर लँड होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी चांद्रयान-2 चं लँडिंग इस्रोमध्ये जाऊन ६० विद्यार्थी आणि शास्त्रज्ञांसमवेत बघणार आहेत. नरेंद्र मोदींनीही नागरिकांना हा अनुपम्य सोहळा पाहण्याचं आवाहन केलंय.

भारताच्या इतिहासात आजची मध्यरात्र सुवर्णक्षरांनी लिहिली जाणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था- इस्रोनं पाठवलेलं 'चांद्रयान-2' आज मध्यरात्री १.३० ते २.३०च्या सुमारास चंद्रावर लँड होणार आहे. हा ऐतिहासिक क्षण डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी देशवासीय उत्सुक आहेत. अशातच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही नागरिकांना हा अनुपम्य सोहळा पाहण्याचं आवाहन केलंय. चांद्रयानाचं लँडिंग पाहतानाच फोटो सोशल मीडियावर पोस्ट करा, मी त्यातले काही रिट्विट करेन, असंही त्यांनी जाहीर केलंय. 

'चंद्रापासून ३० किलोमीटर इतक्या अंतरावर गेल्यानंतर चांद्रयान-2 ची गती कमी करण्यात येणार आहे. 'लँडर विक्रम'ला चंद्राच्या भूमीवर उतरवणं अतिशय आव्हानात्मक आहे. ती १५ मिनिटं अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. आतापर्यंत ४ चक्रव्यूह यशस्वीपणे भेदणारं चांद्रयान हे आव्हानही पार करेल, असा विश्वास देशवासीयांना आहे. परंतु, या १५ मिनिटांत इस्रोच्या शास्त्रज्ञांना सर्वस्व पणाला लावावं लागणार आहे. या सॉफ्ट लँडिंगनंतर चंद्रावर पोहोचणार भारत चौथा देश ठरेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी चांद्रयान-2 चं लँडिंग इस्रोमध्ये जाऊन ६० विद्यार्थी आणि शास्त्रज्ञांसमवेत बघणार आहेत. त्याआधी त्यांनी काही ट्विट करून देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत, अभिनंदन केलं आहे. चांद्रयान-2 चं लँडिंग अधिकाधिक देशवासीयांनी पाहावं, या हेतूने मोदींनी जनतेला एक ऑफर दिली आहे. हे लँडिंग पाहतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यास मोदी तो रिट्विट करणार आहेत. '१३० कोटी देशवासीय ज्या क्षणाची वाट बघत आहेत, तो काही तासांवर आला आहे. देश आणि जग पुन्हा एकदा आमच्या शास्त्रज्ञांची शक्ती पाहील', असं मोदींनी म्हटलंय.

चंद्र कसा बनला आहे? चंद्रात कलाकलाने बदल का-कसा होतो? चंद्रावर पाणी आहे, असलं तर किती आहे? या आणि अशा अनेक रहस्यांचा उलगडा चांद्रयान-2 मुळे होणार आहे. विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरल्यानंतर त्यातून प्रज्ञान रोव्हर बाहेर पडणार आहे. हा रोव्हर पुढची दोन वर्षं चंद्रावरील छायाचित्र इस्रोला पाठवेल. आत्तापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी झाला आहे. आज हा मानाचा तुरा भारताच्या, इस्रोच्या शिरपेचात खोवला जाईल. 

तुम्हीही होऊ शकता या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार 

इस्रोच्या अधिकृत वेबसाइटवर चांद्रयान 2 लँडिंगचे लाइव्ह स्ट्रीमिंग दाखविण्यात येईल. 

प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो(PIB) च्या यू-ट्युब पेजवरून लाइव्ह स्ट्रीमिंग दाखवलं जाईल. 

दूरदर्शनच्या सर्व चॅनेलवर याचं लाइव्ह टेलिकास्ट करण्यात येईल.

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2isroइस्रोNarendra Modiनरेंद्र मोदी