शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींचा मुलगा CBI च्या फेऱ्यात; जय अनमोल अंबानींवर २२८ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा, प्रकरण काय?
2
विधानपरिषद सभापती-सदस्यांचा अपमान करणाऱ्या सूर्यकांत मोरेंविरोधात हक्कभंग
3
तुमची एक छोटीशी चूक आणि PPF च्या व्याजावर भरावा लागू शकतो टॅक्स, जाणून घ्या अधिक माहिती
4
Travel : भारतातील 'या' हिल स्टेशनला जाल तर इटलीचं सौंदर्य विसराल; महाराष्ट्राच्या तर आहे अगदीच जवळ!
5
हिवाळी अधिवेशनात फडणवीस-शिंदे ‘हम साथ साथ है’; दोन्ही नेत्यांची ठरवून कुस्ती, विरोधकच चितपट!
6
ती व्हायरल ब्लू साडी गिरीजा ओकची नव्हतीच, तर 'या' लोकप्रिय मराठी अभिनेत्रीची!
7
Pune Crime: 'चल तुला शाळेत सोडतो', पुण्यात तरुणाचा अल्पवयीन तरुणीवर अत्याचार
8
TATA च्या स्वस्त शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; १८% नं वाढला भाव, ५४ रुपये आहे किंमत
9
ही काय भानगड? आर. अश्विनच्या पोस्टमध्ये झळकली सनी लिओनी! जाणून घ्या त्यामागची गोष्ट
10
प्रवाशांना गुड न्यूज, टाइमटेबल आले; कोकण रेल्वेवर विशेष सेवा, मुंबई-गोवा किती ट्रेन वाढतील?
11
प्रत्येक समस्येला लाडक्या बहिणीशी जोडू नका, नाहीतर घरी बसावे लागेल, मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा
12
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver मध्ये २०३४ रुपयांची घसरण, किती स्वस्त झालं Gold? पाहा
13
डिव्हिडंड आणि भांडवली नफा; शेअर बाजारातील कमाईवर किती लागतो टॅक्स? कुठे वाचतील पैसे?
14
सामान्य नागरिकांना त्रास होईल, असे नियम-कायदे नको; IndiGo संकटावर PM मोदींची प्रतिक्रिया
15
बांगलादेशचे नवे पंतप्रधान कोण होणार? 'या' चार बड्या नेत्यांची नावे चर्चेत; कुणाला सर्वाधिक संधी?
16
शेतकऱ्यांच्या लेकींची उत्तुंग भरारी; ५ मुली झाल्या RAS अधिकारी, एकेकाळी फीसाठी नव्हते पैसे
17
IndiGo: सरकारचा इंडिगो एअरलाइन्सला दणका, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय
18
नवरदेवाने कर्ज काढून लग्न केलं; पहिल्या रात्रीच नववधूने कांड केलं; कळताच कुटुंबाला बसला मोठा धक्का!
19
विराटच्या RCB ने IPL जिंकले पण 'अर्थव्यवस्था' कोसळली! लीगची ब्रँड व्हॅल्यू ६,६०० कोटींनी घटली
20
वडील नव्हे तर आईच्या जातीच्या आधारे मुलीला मिळणार SC प्रमाणपत्र; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

"मंदिर तोडणारे तुमचेच पूर्वज होते"; एमआयएम नेते ओवेसींना रिझवींनी फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 17:26 IST

शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डावरही निशाणा साधला. ते म्हणाले, बोर्ड वाट बघतय, की 'ते भारतात पुन्हा एकदा बाबरी फौज तयार करतील आणि भारतात गृह युद्ध करवून हिंदुस्तानच्या संचालकावर पुन्हा कब्जा करतील.'

ठळक मुद्देरिझवी म्हणाले, ओवेसींना काही त्रास असेल तर त्यांनी पाकिस्तानात जावे.रिझवी यांनी यावेळी ओवेसींना हिंदू-मुसलमानांचे रक्त वाहण्याचे राजकारण बंद करा, असा सल्लाही दिला.ओवेसी म्हणाले होते, नरेंद्र मोदींनी भूमिपूजनासाठी जायला नको होते. ते कुण्या एका धर्माचे पंतप्रधान नाहीत.

नवी दिल्ली - शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सैयद वसीम रिझवी (Waseem Rizvi) यांनी असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांना फटकारले आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाल्यावरून एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी भाष्य केले होते. याला रिझवी यांनी उत्तर दिले आहे. ओवेसींना काही त्रास असेल तर त्यांनी पाकिस्तानात जावे. मात्र, येथील मुसलमानांना शांततेत राहू द्यावे, असे रिझवी यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले वजीम रिझवी -वसीम रिझवी ओवेसींना (Waseem Rizvi Replied To Asaduddin Owaisi) म्हणाले, 'मंदिर तोडणारे तुमचेच पूर्वज होते. ज्यांचा अधिकार तुम्ही हिरावला होता, तो भारतीय संविधानाने त्यांना परत दिला आहे.' एवढेच नाही, तर रिझवी यांनी यावेळी ओवेसींना हिंदू-मुसलमानांचे रक्त वाहण्याचे राजकारण बंद करा, असा सल्लाही दिला. तसेच जिहादच्या नावावर मुसलमानांना भांडन करायला प्रवृत्त करू नका.

व्हिडिओ जारी करत दिलं उत्तर -रिझवी यांनी हिंदी भाषेतून एक व्हिडिओ जारी करत, अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करून ओवेसींना गप्प बसण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, आपण सर्व जण भारतीय संविधानाच्या नियमाने बांधले गेलो आहोत आणि सर्वोच्च न्यायालयानेच राम मंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा केला आहे.

काय म्हणाले होते ओवेसी -अयोध्येतील भूमिपूजनाच्या मुद्द्यावरून एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. ओवेसी म्हणाले होते, नरेंद्र मोदींनी भूमिपूजनासाठी जायला नको होते. ते कुण्या एका धर्माचे पंतप्रधान नाहीत. एवढेच नाही, तर पंतप्रधानांनी 15 ऑगस्टची तुलना 5 ऑगस्टशी केली. पंतप्रधानांनी आज कुणावर विजय मिळवला, असे मी विचारू इच्छितो. हा स्वतंत्र्यासाठी लढलेल्या लोकांचा अपमान आहे, असेही ओवेसी म्हणाले होते.

मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डावरही निशाना -शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डावरही निशाणा साधला. ते म्हणाले, बोर्ड वाट बघतय, की 'ते भारतात पुन्हा एकदा बाबरी फौज तयार करतील आणि भारतात गृह युद्ध करवून हिंदुस्तानच्या संचालकावर पुन्हा कब्जा करतील.' ते म्हणाले, मनाला दिलासा देण्यासाठी मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचा विचार चांगला आहे. पण मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने, असा विचार कसा केला, की भारतीय मुसलमान त्यांच्या मंसुब्यात त्यांची साथ देतील. मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डने भूमिपूजापूर्वी म्हटले होते, की बाबरी मशीद कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहील. हागिया सोफिया याचे चांगले उदाहरण आहे. मशिदीत मूर्ती ठेवल्याने, पूजा-पाठ सुरू केल्याने अथवा दीर्घकाळ नमाजवर प्रतिबंध घातल्याने मशिदीचा दर्जा संपत नाही.

महत्त्वाच्या बातम्या -

Naagin Revenge : नाग पंचमीच्या दिवशी मारला 'नाग', नागिनीचा आतापर्यंत 26 जणांना चावा!

मशिदीच्या पायाभरणीवर योगींचं वक्तव्य; म्हणाले - "मला कुणी बोलावणार नाही अन् मी जाणारही नाही"

CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस

'या' 3 सरकारी बँकांचे होणार खासगीकरण? नीती आयोगाचा सरकारला सल्ला

Corona Vaccine: पुण्याच्या सीरम इस्टिट्यूटचा मोठा दावा, सर्वात पहिले अन् सर्वात मोठ्या प्रमाणावर तयार करणार लस

तंबाखूपासून तयार केली कोरोना लस? मानवी चाचणीसाठी मागितली परवानगी...

युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरMuslimमुस्लीमIslamइस्लाम