शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"मी फक्त आनंदी असल्याचा आव आणत होते पण आता..."; विद्यार्थिनीची हादरवून टाकणारी सुसाईड नोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2021 11:19 IST

Suicide Note After Failing NEET Exams : एका विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल उचललं असून आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं आहे.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक घटना तामिळनाडूमध्ये घडली आहे. एका विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल उचललं असून आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं आहे. नीट परीक्षेत नापास झाल्याने विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणीने एक सुसाईट नोट लिहिली होती. यामध्ये तिने आपण फक्त आनंदी असल्याचा आव आणत होतो असं म्हटलं आहे. तसेच आपल्या पालकांची माफी मागितली आहे. तामिळनाडूमधील निलगिरीस येथे ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय विद्यार्थिनीने  आपलं बारावीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर सप्टेंबर महिन्यात नीट परीक्षा दिली होती. वैद्यकीय पात्रता चाचणीत आपण नापास झाल्याचं समजल्यानंतर ती प्रचंड तणावात गेली होती. मुलगी खूप तणावात असल्याने कुटुंबाने तिला तिरुपूर येथील नातेवाईकांकडे पाठवलं होतं. दिवाळीदरम्यान ती पुन्हा आपल्या घऱी आली होती. पण त्यानंतर देखील ती घरामध्ये शांतच असायची. जास्त कोणाशी बोलायची नाही. तिने नीट परीक्षा नापास झाल्याचं खूप मनावर घेतलं होतं. 

"नीट परीक्षेत नापास झाल्याच्या तणावातून मी बाहेर येऊ शकले नाही"

18 डिसेंबरला शनिवारी मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी तिने सुसाईड नोट लिहून आपल्या आत्महत्येचं कारण सांगितलं. घरच्यांनी तिला तातडीने यानंतर रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचार सुरू असताना 23 डिसेंबरला तिचं निधन झालं. सुसाईड नोटमध्ये तिने "नीट परीक्षेत नापास झाल्याच्या तणावातून मी बाहेर येऊ शकले नाही. मी नेहमी आनंदी असल्याचा आव आता आणू शकत नाही" असं म्हटलं आहे. 

विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना फार मोठा धक्का 

या घटनेने विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना फार मोठा धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अनेकांची चौकशी करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी देखील अशीच एक घटना समोर आली होती. सात नोव्हेंबरला एका रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगाराच्या मुलीने नीट परीक्षेत दोनदा नापास झाल्यानंतर आत्महत्या केली होती. त्याच्या एक महिना आधी 20 वर्षीय तरुणानेही याच कारणामुळे आयुष्य संपवलं होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :NEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकालTamilnaduतामिळनाडू