शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वसुंधरा राजे यांच्यावर दिल्ली झाली नाराज? पंतप्रधान मोदींना भेटण्याची वेळ मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 06:42 IST

अनेक प्रयत्न केल्यानंतरही वसुंधरा राजेंना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीची वेळ मिळू शकलेली नाही.

संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री व दिग्गज नेत्या वसुंधरा राजे यांना राजस्थान विधानसभा निवडणुकीत प्रमुख भूमिका हवी असून, यासाठी भाजपच्या केंद्रीय नेत्यांना भेटण्याकरिता त्यांनी दिल्लीत ठाण मांडले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक प्रयत्न केल्यानंतरही त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याचा वेळ मिळू शकलेला नाही.

राजस्थान भाजप निवडणूक घोषणापत्र समिती व निवडणूक व्यवस्थापन समितीमध्ये नाव न आल्याने माजी मुख्यमंत्री व भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष वसुंधरा राजे यांनी आपली सर्व शक्ती राजस्थान भाजप निवडणूक मोहीम समितीचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी लावली आहे. याबाबत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. वसुंधरा राजे, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यासारख्या नेत्यांची शक्यता जास्त आहे.

वसुंधरा राजे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व भाजपचे संघटन राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी त्या वेळ मागत आहेत. परंतु हा वेळ अद्याप मिळालेला नाही.

बाजूला सारले?

वसुंधरा राजे यांना राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत मुख्य भूमिका पाहिजे. परंतु भाजपचे केंद्रीय नेतृत्व यासाठी तयार नाही. वसुंधरा राजे यांना राजस्थानच्या बाहेर ठेवण्यासाठी पक्षाने त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष केले आहे. 

अखेरच्या क्षणी टाकला दबाव, मात्र...

२०१८ च्या विधानसभा निवडणुकीत वसुंधरा यांनी अखेरच्या क्षणी केंद्रीय नेतृत्वावर दबाव टाकून ४० जागांवर आपल्या पसंतीचे उमेदवार घोषित करवून घेतले होते आणि ते सर्व  पराभूत झाले होते. त्यामुळे भाजप सत्तेबाहेर गेला. अलीकडेच वसुंधरा राजे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती, तेव्हा अमित शाह यांनी त्यांना एवढा आग्रह केला नसता तर राजस्थानमध्ये भाजपचे सरकारच कायम राहिले असते, या बाबीची आठवण दिली.

 

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारण