शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

सावधान... दिल्लीसह महाराष्ट्रात धोका वाढतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 05:43 IST

नवे २२ हजार ८५४ रुग्ण

विकास झाडेलोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाने पुन्हा तोंड वर काढले आहे. २४ तासामध्ये सर्वाधिक २२ हजार ८५४ नवीन रुग्णांची नोंद झाली असून दिल्ली, पंजाब आणि महाराष्ट्रातील आकडे चिंताजनक दिसून येतायेत.एकीकडे शेतकरी आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे नवीन कोरोना रुग्णांचा आलेख वेगाने वाढत आहे. दिल्लीमध्ये गेल्या २४ तासामध्ये १२० प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली का? यावर आता चर्चा सुरू झाली आहे. देशात कोरोनाच्या पहिल्या लाटेचा शेवट संपुष्टात आल्यानंतर सात दिवसांच्या सरासरीने नवीन कोरोना प्रकरणात ६७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दि. ११ फेब्रुवारीपर्यंत देशात दररोज कोरोनाची प्रकरणे ११ हजारच्या जवळपास होती. एका दिवसात महाराष्ट्रात ७०६७, तर पंजाबमध्ये ६६७ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.नवीन कोरोना विषाणूची लक्षणे आणि भय व शंका! एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी, भारतात नवीन कोरोनाचा त्रास अधिक संसर्गजन्य असू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली. 

एम्सचे प्राध्यापक डॉ. अमरिंदरसिंग म्हणतात, ‘हा कोरोना विषाणूचा परिवर्तित ताण आहे, म्हणूनच तो जीवघेणा आहे. अधिक तीव्रतेने पसरत आहे असे दिसते.’ आपल्या लक्षात आले असेल की, लंडनमधील मृत्यूचे प्रमाण खूपच वाढले आहे. ज्यांना यापूर्वी कोरोना झाला होता त्यांनाही नव्याने बदल झालेल्या कोरानामुळे पुन्हा संसर्ग होऊ लागला आहे. पूर्वी तयार केलेल्या अँटिबॉडीज त्यावर कार्य करणार नाहीत. हा विषाणूचा परिवर्तित ताण असल्याने सध्याची लसदेखील प्रभावी असल्याचे सिद्ध होत नाही. तथापि, चांगली गोष्ट म्हणजे आपण तयार केलेली लस या परिवर्तित ताणाविरुद्ध स्वतंत्रपणे तयार केली जाऊ शकते.सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेंशन (सीडीसी) यांनी २०२० मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार कोविड -१९ ची लक्षणे कमी होण्यास आठवडे लागू शकतात आणि लोक आपल्या आरोग्याच्या सामान्य स्थितीत परतू शकतात.

दीर्घकालीन प्रभावnजागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, काही लोकांना कोविडचे दीर्घकालीन प्रभाव जाणवू शकतात. या दीर्घकालीन प्रभावांमध्ये थकवा, श्वसन लक्षणे आणि न्यूरोलॉजिकल लक्षणांचा समावेश असू शकतो. nकाही संशोधने असे सूचित करतात की, कोविड -१९ ची सौम्य लक्षणे असलेले लोक सहसा कोरोना संसर्ग झाल्यापासून एक ते दोन आठवड्यांच्या आत बरे होतात. गंभीर प्रकरणांमध्ये निरोगी होण्यासाठी सहा आठवडे किंवा त्याहून अधिक वेळ लागू शकतो. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसdelhiदिल्ली