शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कडाक्याच्या थंडीची उत्तर भारतात लाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 05:13 IST

दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, हिमाचल प्रदेश अशा सर्व उत्तर भारतात रविवारपासून थंडीची लाट पसरली असून, सोमवारी श्रीनगरमध्ये रविवारी रात्री ११ वर्षांतील नीचांकी तापमान नोंदले गेले.

चंदीगड : दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, हिमाचल प्रदेश अशा सर्व उत्तर भारतात रविवारपासून थंडीची लाट पसरली असून, सोमवारी श्रीनगरमध्ये रविवारी रात्री ११ वर्षांतील नीचांकी तापमान नोंदले गेले. येथे किमान तापमान उणे ६.८ अंश सेल्सिअस होते. त्यामुळे सोमवारी डल लेक आणि परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांतील पाणी गोठले गेले.सकाळी पसरलेल्या धुक्यामुळे वाहनांना समोरील काही दिसत नव्हते. त्यामुळे झज्जर जिल्ह्यात एका जीपने ट्रकला धडक दिल्याने ७ जण ठार झाले. झज्जर बायपासवर सकाळी धुक्यामुळे हा अपघात झाला. या अपघातानंतर किमान ५0 वाहने एकमेकांवर आदळली.श्रीनगरमध्ये आतापर्यंतचे नीचांकी तापमान १३ डिसेंबर १९३४ रोजी उणे १२.८ अंश सेल्सिअस नोंदले गेलेले आहे. ३१ डिसेंबर २००७ रोजी शहरात किमान तापमान उणे ७.२ अंश सेल्सिअस होते. उत्तर काश्मीरच्या कुपवाडात उणे ६, पहलगाम उणे ७.२, गुलमर्ग उणे ६.८, लेह उणे १४.७, कारगिल उणे १५.३ अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदले गेले.अमृतसरमधील किमान तापमान १.१ अंश सेल्सिअस एवढे नीचांकावर पोहोचले आहे. अमृतसर आणि हलवारामध्ये किमान तापमान सारखेच राहिले. लुधियाना, पटियाला, आदमपूर, अमृतसर, हलवारा, सिरसा, भिवानी, रोहतक, झज्जर आणि अंबालासह दोन राज्यांत धुक्यामुळे अनेक ठिकाणी दृश्यमानता कमी होती. आदमपूरमध्ये किमान तापमान १.६, बठिंडात ३.२ अंश सेल्सिअस होते. हरियाणात कर्नाल सर्वात थंड ठिकाण राहिले. येथे तापमान ३.४ अंश सेल्सिअस होते. अंबाला आणि हिसारमध्ये किमान तापमान ३.८ आणि ४.५ अंश सेल्सिअस होते. संयुक्त राजधानी चंदीगडमध्ये तापमान ५.४ अंश सेल्सिअस होते. (वृत्तसंस्था)दिल्ली प्रदूषितचनवी दिल्ली : राजधानी दिल्लीत हवेच्या प्रदूषणाची स्थिती गंभीर झाली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या (सीपीसीबी) शिफारशींवर पर्यावरण प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणाने (ईपीसीए) सोमवारी दिल्लीतील औद्योगिक परिसरातील कामकाज बंद ठेवण्यास सांगितले आहे.दिल्ली, फरिदाबाद, गुरुग्राम, गाजियाबाद आणि नोएडामध्ये प्रदूषण करणारे अनेक उद्योग बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच कामाशिवाय लोकांनी घराबाहेर पडू नये, असेही आवाहन प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :Indiaभारत