नवी दिल्ली : देशातील भव्य राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारणीचे ठिकाण लवकरच निश्चित करण्यात येईल, अशी माहिती संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी दिली़ शनिवारी कारगील विजयदिनी अमर जवान ज्योती येथे शहिदांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होत़े
देशासाठी बलिदान देणा:या सर्व शहिदांची नावे युद्ध स्मारकावर कोरली जातील़ या स्मारकासाठी जागेचा शोध सुरू आह़े मी लवकरच सैन्याच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत इंडिया गेट परिसरानजीक प्रिन्सेस पार्क भागाची पाहणी करणार आह़े प्रिन्सेस पार्कनजीक एक मोठय़ा विस्तीर्ण जागेत वा त्याच्या आजूबाजूला युद्ध स्मारकासाठी जागा मिळेल, अशी अपेक्षा आह़े, असे ते म्हणाल़े एक भव्य युद्ध स्मारक आणि युद्ध संग्रहालय साकारण्यासाठी निश्चितपणो काही वेळ लागेल, असेही त्यांनी सांगितल़े या स्मारकासाठी केंद्र सरकारने 1क्क् कोटी रुपयांची तरतूद केली आह़े
सैन्य दलांच्या आधुनिकीकरणासाठी निधीच्या कमतरतेबाबत विचारले असता जेटली म्हणाले की, असे काहीही नाही़ सैन्य पूर्णत: सज्ज आणि सक्षम आह़े सैन्य दलांच्या गरजा पूर्ण करणो ही सरकारची प्राथमिकता आह़े
लष्करप्रमुख जनरल विक्रम सिंह, नौदलप्रमुख अॅडमिरल रॉबिन धोवन व हवाईदलप्रमुख एअर चीफ मार्शल अरुप राहा यांनीही यावेळी कारगिलच्या शहिदांना श्रद्धांजली वाहिली.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता
द्रास - भारताच्या सीमेवर चीनकडून वारंवार होत असलेली घुसखोरी ही सीमेबाबत असलेल्या समजाच्या फरकामुळे होत असल्याचे सांगून, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांततापूर्ण परिस्थिती असल्याचा निर्वाळा लष्कराने आज दिला आहे.
जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्ट. जनरल डी.एस. हुडा यांनी चीनच्या सीमेवरील परिस्थिती शांततापूर्ण असून येथे कोणतीही समस्या नाही, असे म्हटले. गोळीबाराची एकही घटना घडली नसल्याचे सांगून, त्यांनी पुढे काही भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला समजून घेण्याबाबत गोंधळ असल्याचे प्रतिपादन केले आहे.
प्राणांची आहुती देणा:या शहिदांच्या हौत्मात्म्यास साजेसे व भावी पिढय़ांना स्फूर्ती मिळेल असे राष्ट्रीय पातळीवरील भव्य-दिव्य युद्धस्मारक नसलेला भारत हा जगातील बहुधा एकमेव मोठा देश आहे. नुसत्या स्वातंत्र्योत्तर काळाचा विचार केला तरी युद्धभूमीवर प्राणाहुती देणा:यांची संख्या सुमारे 13 हजाराच्या घरात आहे.
1948-काश्मीरमधील संघर्ष- 1,1क्4
1962-चीनविरुद्धचे युद्ध- 3,25क्
1965-पाकिस्तानविरिद्धचे युद्ध- 3,264
1971-बांगला देश मुक्तीसंग्राम- 3,843
1987-श्रीलंकेतील शांतीसेना- 1,157
1999-कारगिल युद्ध-522