शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

मोदी-शहांविरुद्धच्या लढाईत 'आप'ण जिंकलो, मी पराभूत नसून 'शहीद' 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 6:05 PM

दिल्ली विधानसभा निवडणुकीत 2020मध्ये पुन्हा एकदा मोठा विजय मिळवल्यानंतर आम आदमी पार्टीचे

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या 8 उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामध्ये, करावलनगर मतदारसंघातील केजरीवाल यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय दुर्गेश पाठक पराभूत झाले आहेत. मात्र, पराभवानंतरही त्यांनी कार्यकर्ते आणि सहकारी मित्रांना मोठा धीर दिला. विशेष म्हणजे, पराभवानंतरही त्यांनी मोठ्या हिंमतीने भाषण करत, मी जरी हरलो तरी 'आप'ण जिंकलो हे महत्वाचं असल्याचं दुर्गेश यांनी म्हटलंय. 

आपली लढाई ही मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात होती. आपली लढाई ही दोन विचारांची लढाई होती. लढाई लढताना काही सैनिक शहीद होत असतात, शहीद सैनिकांचं दु:ख न बाळगता त्यांचा अभिमान-गर्व बाळगला पाहिजे, असे दुर्गेश यांनी म्हटले. कारण, सैनिक जरी शहीद झाले तरी आपण लढाई जिंकली आहे. मोदी अन् शहा यांचा चांगलाच हिसका दाखवलाय, असेही त्यांनी म्हटले. आपण या पराभवाचा नक्कीच बदला घेऊ, दोन वर्षांनी आणखी एक निवडणूक होईल, त्यावेळी पाचही जागा जिंकायच्या आहेत. आता, त्याच काम आपल्याला करायचंय. मी जरी पराभूत झालो असलो तरी, मी तुम्ही म्हणाल तिथं काम करणार. आमदार असो किंवा नसो तुमच्यासाठी सर्वकाही करेल, असे म्हणत दुर्गेश यांनी कार्यकर्त्यांचं मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला.    

दिल्ली विधानसभा निवडणुकीत 2020मध्ये पुन्हा एकदा मोठा विजय मिळवल्यानंतर आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल 16 फेब्रुवारीला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दिल्लीतल्या रामलीला मैदानात कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केजरीवाल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यामुळे, केजरीवाल तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत.  दिल्ली विधानसभा निवडणुकी 2015च्या निवडणुकांसारखाच यंदाही आपने मोठा विजय मिळवला. आपनं 62 जागांवर विजय मिळवलेला असून, गत निवडणुकीच्या तुलनेत 5 जागा कमी झालेल्या आहेत. भाजपाला या निवडणुकीत 8 जागाच राखता आल्या. तर काँग्रेसच्या 67 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे. निवडणूक निकालाचं विश्लेषण करताना मनिष सिसोदिया यांनी भाजपवर शरसंधान साधले.  

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालVotingमतदानMartyrशहीदNarendra Modiनरेंद्र मोदी