शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

संसद चालावी ही इच्छा, सरकारला अदानी प्रकरणावर चर्चा नको असल्याचा आरोप : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 08:37 IST

अदानीशी निगडित मुद्यावरील लक्ष्य हटविण्यासाठी जॉर्ज सोरोस सोबतच्या संबंधाचा मुद्दा उकरून काढला आहे. केंद्र सरकारला अदानी प्रकरणावर चर्चा नको आहे. त्यामुळे ते चर्चा दुरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आम्ही हा मुद्दा मांडत राहू असा दावा गांधींनी केला. 

नवी दिल्ली : संसदेचे कामकाज चालावे ही आमची इच्छा आहे. मात्र, केंद्र सरकारची अदानी प्रकरणावर चर्चा करण्याची इच्छा नसल्याचा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. भाजप खासदार निशिकांत दुबे यांचे आक्षेपार्ह वक्तव्य लोकसभेच्या कामकाजातून काढून टाकावे यासाठी गांधींनी बुधवारी लोकसभा अध्यक्ष ओब बिर्ला यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना गांधींनी सरकारवर टीका केली.

सभागृहात कामकाज चालावे हा आमचा उद्देश असून संसेदत चर्चा व्हायला हवी. सत्ताधाऱ्यांना माझ्याबद्दल जे काही बोलायचे आहे, ते त्यांनी बोलावे. मात्र, संसदेचे कामकाज सुरळीत चालायला हवे. १३ व १४ डिसेंबर रोजी लोकसभेत संविधानावर चर्चा करण्याचे निश्चित झाले होते. त्यामुळे ही चर्चा व्हायला हवी, असे ते म्हणाले. अदानीशी निगडित मुद्यावरील लक्ष्य हटविण्यासाठी जॉर्ज सोरोस सोबतच्या संबंधाचा मुद्दा उकरून काढला आहे. केंद्र सरकारला अदानी प्रकरणावर चर्चा नको आहे. त्यामुळे ते चर्चा दुरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आम्ही हा मुद्दा मांडत राहू असा दावा गांधींनी केला. 

सोरोस मुद्द्यावरून सदन स्थगित लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर काँग्रेसने सोरोस प्रकरणावरून सरकारला लक्ष्य केले. केंद्र सरकार मणिपूरमधील परिस्थिती लपवण्यासाठी जॉर्ज सोरोस प्रकरणाचा ढाली प्रमाणे वापर करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला.नंतर सत्ताधाऱ्यांनी सोरोससोबत संगनमत करून काँग्रेस देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. नंतर गोंधळामुळे कामकाज दीड तास स्थगित झाले.

अणुऊर्जा क्षमता तिप्पट होईलnभारतीची अणुऊर्जा क्षमता गत दशकात दुप्पट झाली असून ती २०३१ पर्यंत तिप्पट होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली.nगत दोन दशकात अणुऊर्जा क्षमता ४,७८० मेगावॅटवरून ८,०८१ मेगावॅट झाली आहे. मात्र, त्यात वाढ होऊन ती २०३१-३२ मध्ये २२,४८० मेगावॉट होईल, अशी अपेक्षा असल्याचे सिंह यांनी सांगितले. 

...तरच एआय कायदा शक्यसंसद व समाजाची परवानगी असेल तरच केंद्र सरकार कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)चा वापर करण्यासंदर्भात कायदा करण्यास तयार असल्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत सांगितले. काँग्रेस खासदार अदूर प्रकाश यांच्या पूरक प्रश्नाला उत्तर देताना वैष्णव बोलत होते.

तिरंगा व गुलाब देत विरोधकांची निदर्शनेnअदानी समूहाशी निगडित मुद्यावर इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी बुधवारी अनोख्या पद्धतीने संसद परिसरात निदर्शने केली.nदरम्यान विरोधकांनी सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांना तिरंगा व गुलाबाची फुले भेट देत आंदोलन केले. संसद भवनाच्या मकरद्वारजवळ एकत्र आलेल्या विरोधी पक्षांच्या खासदारांच्या हातात तिरंगा झेंडा व गुलाबाचे फुले होती.nकाँग्रेस, राष्ट्रीय जनता दल व इंडिया आघाडीतील काही घटक पक्ष या निदर्शनात सहभागी झाले होते. काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधीदेखील या निदर्शनात सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी