शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन पोपट खरेदी करायला गेली अन् तिचाच झाला पोपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2018 10:20 IST

कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये एक मजेदार प्रकरण समोर आलं आहे. एका महिलेला पोपट पाळायचा होता. त्यासाठी तिनं ऑनलाइन पद्धतीनं ऑर्डर दिली. परंतु अखेरपर्यंत ऑर्डर न आल्यानं तिचाच पोपट झाला आहे.

बंगळुरू- कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये एक मजेदार प्रकरण समोर आलं आहे. एका महिलेला पोपट पाळायचा होता. त्यासाठी तिनं ऑनलाइन पद्धतीनं ऑर्डर दिली. परंतु अखेरपर्यंत ऑर्डर न आल्यानं तिचाच पोपट झाला आहे. या पोपट खरेदी प्रकरणात त्या महिलेची 71 हजार 500 रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. हे प्रकरण सरजापूर रोडवरील विजयकुमार या परिसरात उघडकीस आलं आहे.महिलेनं या प्रकाराची सायबर क्राइममध्ये तक्रार दिली आहे. श्रीजा नावाच्या महिलेनं पोलिसांना सांगितलं की, ब-याच दिवसांपासून मला पोपट पाळण्याची इच्छा होती. मी ऑनलाइन पोपट खरेदी करता येऊ शकतो का, याचा शोध घेत होती. त्याच दरम्यान माझा बॉबी नावाच्या व्यक्तीशी माझा संपर्क आला. त्यानं त्याचा व्हॉट्सअॅप नंबरही मला दिला. त्यामुळे मला तो विश्वासास पात्र असल्याचं वाटलं. परंतु त्यानं माझी फसवणूक केली. बॉबीशी पोपट घेण्यासंदर्भात बोलणी झाल्यानंतर श्रीजानं बॉबीच्या विविध बँक खात्यात 21 जूनपासून 23 जूनपर्यंत पैसे ट्रान्सफर केले होते. बॉबीच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्यानंतरही श्रीजाला काही पोपट मिळाला नाही. जेव्हा श्रीजानं बॉबीला फोन केला, त्यावेळी त्यानं श्रीजाला काहीही उत्तर दिलं आहे. तसेच व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवल्यानंतरही बॉबीनं काहीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतर श्रीजाला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं.25 जून रोजी तिने सायबर क्राइम आणि पोलिसांत जाऊन गुन्हे दाखल केले. श्रीजाच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस श्रीजानं पैसे ट्रान्सफर केलेल्या त्या आरोपीच्या बँक खात्यांचा तपास करत आहे. तसेच पोलिसांनी ऑनलाइन पद्धतीनं होणा-या फसवणुकीवर वारंवार जनजागृती केल्याचंही सांगितलं आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी