शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

भूगोलामध्ये करिअर करायचं आहे? मग या करिअर वाटांची माहिती घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 13:51 IST

भूगोलातील शिक्षणानंतर करिअरचे मार्ग जाणून घ्या, अध्यापनापासून पर्यटनापर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये संधी

मुंबई- तुम्हाला चार भिंतींच्या बाहेरच्या निसर्गाची आवड आहे का? इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करायची आवड आणि इच्छा आहे असेल आणि मुख्य म्हणजे जगभरात काय चाललं आहे हे जाणून घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही भूगोल या विषयाची निवड करिअरसाठी करु शकता. भूगोल या विषयामध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाची सोय भारतातील बहुतांश विद्यापिठांमध्ये उपलब्ध आहे. या विद्यापिठांमध्ये तीन वर्षांचा बी.ए. आणि दोन वर्षांचा एम.ए,. किंवा एम.एस्सी हे अभ्यासक्रम पदवीनंतर शिकवले जातात. त्यानंतर काही विद्यापिठांमध्ये जीआयएस म्हणजे जिओग्राफिकल इन्फर्मेशन सिस्टीम व रिमोट सेन्सिंगचे अभ्यासक्रम शिकवण्याची सोय असते. भूगोल या विषयाशी संबंधित पर्यटन हे क्षेत्र असल्यामुळे पर्यटनासंबंधित अभ्यासक्रम ही या विद्यापिठांमध्ये शिकवले जाते.भूगोल विषयातून शिक्षण घेतल्यावर कोणत्याप्रकारच्या संधी तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात? 1) कार्टोग्राफर म्हणजे नकाशे तयार करणे. या मध्ये विविध आधुनिक तंत्रानी नकाशे तयार करण्याचे ज्ञान दिले जाते.2) एन्व्हायर्नमेंट कन्सल्टंट- यामध्ये पर्यावरणासंबंधी शिक्षण दिलं जाते, बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्येही यासाठी विशेष पदे असतात.3) लँडस्केप आर्किटेक्ट- भूगोलाचे विद्यार्थी लँडस्केपिंग चांगल्या प्रकारे करु शकतात.4) जीआयएस अधिकारी- आजकाल सर्व क्षेत्रात जीआयएसचे महत्व वाढले आहे त्यामुळे जीआयएस येणाऱ्या तज्ज्ञांची गरज कंपन्यांना भासते.5) अध्यापन- भूगोल विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना नेट-सेट या परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर असिस्टंट लेक्चरर पदासाठी काम करता येईल, तसेच विविध शाळांमध्ये अध्यापनासाठीही तयारी करता येईल.6) पर्यटन- पर्यटन क्षेत्र आज वेगाने विस्तारत आहे. भूगोलाचे पदव्युत्तर शिक्षण घेताना पर्यटनाचा अभ्यासक्रमात समावेश असेल तर उत्तम किंवा पर्यटनामध्ये पदविका मिळवल्यास देश-विदेशातील कंपन्यांमध्ये संधी मिळू शकते. तसेच याबरोबर एखादी परदेशी भाषेची जोड देता आली तर इतरांपेक्षा लवकर प्राधान्य मिळेल.

टॅग्स :Educationशिक्षणCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन