शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
2
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
3
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
4
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
5
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
6
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
7
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
8
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
9
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
10
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
11
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
12
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
13
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
14
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
15
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
16
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
17
'वैभव'शाही वर्ष! १४ वर्षांच्या पोरानं MS धोनी-विराटला मागे टाकत सेट केला आपला ट्रेंड
18
"इम्रान खान 'वेडा', त्याची विधाने देशाविरोधी अन् चिथावणीखोर"; पाकिस्तान आर्मीचा मोठा दावा
19
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
20
IND vs SA वनडेआधी मोठी दुर्घटना टळली, फॅन्सच्या गर्दीमुळे होती चेंगराचेंगरीची भीती (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वॉलमार्ट आज फ्लिपकार्ट विकत घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2018 09:23 IST

15 बिलियन अमेरिकन डॉलर्सला फ्लिपकार्टची विक्री

नवी दिल्ली: रिटेल क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी कंपनी असलेली वॉलमार्ट आज फ्लिपकार्ट कंपनी विकत घेणार आहे. 15 बिलियन अमेरिकन डॉलर्समध्ये वॉलमार्टनं फ्लिपकार्ट विकत घेतलीय. आज दुपारपर्यंत याबद्दलची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. यासाठी वॉलमार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाऊज मॅकमिलन भारतात आले आहेत. वॉलमार्ट ही जगातील रिटेल क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे. तर फ्लिपकार्ट ही भारतातील ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. या दोन कंपन्यांमध्ये तब्बल 15 बिलियन अमेरिकन डॉलर्सचा व्यवहार होणार आहे. यामुळे वॉलमार्ट ही कंपनी भारतीय ई-कॉमर्स क्षेत्रात प्रवेश करेल. वॉलमार्टकडून फ्लिपकार्टची खरेदीहोत असल्याची घोषणा होण्याआधी बंगळुरुमधील टेक व्हिलेजमध्ये वॉलमार्टचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डाऊज मॅकमिलन फ्लिपकार्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतील. यानंतर दोन्ही कंपनीच्या अधिकाऱ्यांची गुरुग्राममधील वॉलमार्ट इंडियाच्या मुख्यालयात बैठक होईल.

फ्लिपकार्टच्या खरेदीसाठी वॉलमार्टनं 15 बिलियन अमेरिकन डॉलर मोजले आहेत. फ्लिपकार्टच्या खरेदीत अॅमेझॉननंदेखील रस दाखवला होता. मात्र फ्लिपकार्टनं वॉलमार्टनं दिलेला प्रस्ताव स्वीकारला. फ्लिपकार्टमधील 75 ते 80 टक्के हिस्सा वॉलमार्ट खरेदी करणार आहे. यातून होणाऱ्या फायद्यावर फ्लिपकार्टला कर भरावा लागेल. अॅमेझॉनमध्ये काम करताना सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल यांना फ्लिपकार्टची कल्पना सुचली. यातूनच पुढे फ्लिपकार्टचा जन्म आणि विस्तार झाला. यानंतर पुढे अॅमेझॉननंदेखील भारतीय ई-कॉमर्स क्षेत्रात पाऊल ठेवलं. फ्लिपकार्टनं अॅमेझॉनला चांगली टक्कर दिली. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये फ्लिपकार्टचं महसुली उत्पन्न घटलं होतं.  

टॅग्स :Flipkartफ्लिपकार्ट