शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गायीच्या शेणापासून तयार केलेल्या रंगाने भिंती रंगणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 03:43 IST

खादी ग्रामाेद्याेगने आणला नैसर्गिक रंग; दाेन प्रकारांत उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्क भुवनेश्वर : खेड्यांमध्ये घरे गायीच्या शेणाने सारवतात. ग्रामीण भागातील ही परंपरा घरांमध्ये विविध जीवाणूपासूनही रक्षण करते. आता त्याच शेणापासून बनविलेल्या रंगापासून घरे रंगणार आहेत. खादी आणि ग्रामाेद्याेग आयाेगाने गायीच्या शेणापासून तयार केलेला पर्यायवरणपूरक, जीवाणूराेधी, तसेच बिनविषारी रंग बाजारात आणला आहे. केंद्रीय महामार्ग आणि सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्याेगमंत्री नितीन गडकरी यांनी या रंगाचा शुभारंभकेला. 

‘वेदिक पेंट’ या नावाने हे उत्पादन सादर करण्यात आले आहे. हा रंग स्वस्त असून गंधहीन आहे, तसेच भारतीय मानक ब्युराेने त्यास प्रमाणितही केले आहे. शेतकऱ्याचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टिकाेनातून पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या विचारांनी प्रेरित हाेऊन, या रंगाचे उत्पादन करण्यात आले आहे. 

रंगाची किंमत अतिशय कमीया रंगाची किंमतही अतिशय कमी आहे. डिस्टेंपर १२० रुपये तर इमल्शन २२५ रुपये लीटर किमतीत उपलब्ध हाेणार आहे. घराच्या आतील आणि बाहेरच्या भिंतीही या रंगाने रंगविण्यात येऊ शकतात. रंग ४ तासांमध्ये वाळताे, तसेच फिनिशिंगही उत्तम येते. पांढऱ्या बेस रंगात पॅकिंग असून, रंगीत द्रव्य मिसळून हवा ताे रंग मिळविता येताे. 

गायीचे शेण पाच रुपये प्रतिकिलो! एक गाय, कडुनिंबाचे झाड अर्थव्यवस्था बदलू शकतात. वेदीक पेंटमुळे शेतकऱ्यांना दर किलो शेणामागे ५ रुपये मिळतील. एक गाय दिवसाला २० ते ३० किलो शेण देते. अशात शेतकऱ्यांना दररोज सरासरी १०० रुपये मिळतील आणि ‘वेस्ट टू वेल्थ’ ही संकल्पना साकारल्या जाईल, असे नितीन गडकरी म्हणाले. गोमुत्रापासूनही शेतकऱ्यांना उत्पन्न मिळेल. 

 

टॅग्स :cowगाय