शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्टी झाकण्यासाठी उभारली जातेय भिंत, रहिवासी भाजपावर खवळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 18:15 IST

या भागातील झोपडपट्टीत राहणाऱ्या महेशन म्हटले की

मुंबई - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या 24-25 फेब्रुवारीला भारताच्या दौऱ्यावर येत आहेत अशी माहिती व्हाइट हाऊसकडून देण्यात आली आहे. अमेरिका आणि भारताचे संबंध मजबूत करण्यासाठी या दौऱ्याचं नियोजन आहे. मात्र, या दौऱ्याच्या निमित्ताने डोनाल्ड ट्रम्प यांना अहमदाबादलाही भेट देणार असल्याचे समजते. त्या पार्श्वभूमीवर अहमदाबादमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. 

अहमदाबाद महानगरपालिकेकडून गरीब वस्ती म्हणजे स्लम एरियासमोर मोठी भिंत बांधण्यात येत आहे. सरदार वल्लभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ ते इंदिरा ब्रीज या भागात ही भिंत बांधण्यात येत आहे. विशेष म्हणजे याबाबत महापालिकेच्या महापौर बिजल पटेल यांनाही माहिती नाही. मला माहिती नसून मी पाहिलं नाही, असे पटेल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. त्यामुळे, केवळ ट्रम्प यांच्या दौऱ्यावेळी सभोवतालचा स्लम एरिया झाकला जावा, या हेतुने ही भिंत बांधण्यात येत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. या भागातील झोपडपट्टीत राहणाऱ्या महेशन म्हटले की, आत्तापर्यंत येथे हिरव्या रंगाचा कपडा टाकण्यात आला होता. आता, भिंत बांधण्यात येत आहे. सरकारला जर गरिबांची लाज वाटत असेल तर गरिबी हटविण्यासाठी ठोस पाऊल का उचलत नाहीत, असे म्हणत महेशने संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, यापूर्वी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि चीनचे शी जीनपिंग यांच्या अहमदाबाद दौऱ्यावेळीही हिरव्या कपड्या या भागाला झाकण्यात आले होते. 

दरम्यान, मनसेने ट्रम्प यांच्या कार्यक्रमावरील नावाला आक्षेप घेतला आहे. मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी ट्विट करुन म्हटले की, ट्रम्प अहमदाबादला भेट देणार आहेत. पुन्हा अहमदाबाद, त्या कार्यक्रमाचे नाव केम छो मिस्टर प्रेसिंडेंट? हे केम छो का? असा सवाल मनसेकडून उपस्थित करण्यात आला आहे.  

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पNarendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरातAmericaअमेरिकाAirportविमानतळ