शेतकर्यांना पीक विम्याची प्रतिक्षा
By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST
नांदेड : खरीप हंगामातील विविध पिकांचा जिल्हयातील मोठ्या प्रमाणात शेतकर्यांनी पीक विमा काढला. मात्र अद्यापही पीकांना विमा मंजूर झाला नसल्याने शेतकर्यांना पीकविम्याची प्रतिक्षा लागली आहे.
शेतकर्यांना पीक विम्याची प्रतिक्षा
नांदेड : खरीप हंगामातील विविध पिकांचा जिल्हयातील मोठ्या प्रमाणात शेतकर्यांनी पीक विमा काढला. मात्र अद्यापही पीकांना विमा मंजूर झाला नसल्याने शेतकर्यांना पीकविम्याची प्रतिक्षा लागली आहे. नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन या पिकांचा तसेच केळी, मौसंबी या पिकांचाही अनेक शेतकर्यांनी विमा काढला. जिल्ह्यात शासनाने दुष्काळी स्थिती जाहीर करुनही अद्याप विमा कंपन्याकडून नुकसान भरपाई देण्यासाठी कोणत्याही हालचाली नाहीत. यामुळे शेतकर्यांच्या पदरात पीके काहीच पडली नसल्याने पीकांचा विमातरी त्वरीत मंजूर करुन शेतकर्यांना रक्कम द्यावी, अशी मागणी होत आहे.