शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रतीक्षा संपली; लस घेऊन विमाने झेपावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 05:15 IST

१४ जानेवारीपर्यंत सर्व लसी पाेहाेचणार, पहिल्या दिवशी १३ राज्यांमध्ये वाहतूक

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : काेराेनाच्या लसीसाठी अखेर प्रतीक्षा संपली आहे. आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केलेल्या ‘काेविशिल्ड’ लसीचे ५४ लाखांहून अधिक डोस पुण्यातून १३ राज्यांमध्ये पाेहाेचले आहेत, तर १४ जानेवारीपर्यंत सर्व १.६५ काेटी डोस इतर राज्यांमध्ये पाेहाेचविले जाणार आहेत. देशभरात १६ जानेवारीला काेराेना लसीकरणाचा शुभारंभ हाेणार असून, पुणे विमानतळ लस वाहतुकीचे हब बनले आहे. 

सीरम इन्स्टिट्यूटच्या लसीचे वितरण मंगळवारपासून सुरू झाले. केंद्र सरकारने ‘सीरम’ला १ काेटी १० लाख लसींची ऑर्डर दिली आहे, तर दुसऱ्या टप्प्यात ४.५ काेटी लसींची ऑर्डर देण्यात येणार आहे. भारत बायोटेककडून ५५ लाख लसी विकत घेण्यात येणार आहेत. त्यापैकी १६.५ लाख लसी मोफत देण्यात येणार आहेत. केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली, चेन्नई, काेलकाता, गुवाहाटी, हैदराबाद, शिलाँग, अहमदाबाद, विजयवाडा, भुवनेश्वर, पाटणा, बंगळुरू, लखनाै आणि चंदीगड या १३ शहरांमध्ये लस पाठविण्यात आली आहे. 

१६ जानेवारीपासून लसीकरण

आणखी ४ लसी हाेणार उपलब्धnकाेविशिल्ड आणि काेव्हॅक्सिन या दाेन लसींनंतर भारतात लवकरच आणखी ४ कंपन्या काेराेना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी अर्ज करणार आहेत. त्यामुळे भारतात एकूण ६ लसींचा पर्याय उपलब्ध हाेणार असल्याची माहिती आराेग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली. nझायडस-कॅडीला, स्पुटनिक व्ही, बायाेलाॅजिकल इव्हांस आणि जिनाेव्हा या कंपन्या भारतात लस आणणार आहेत. इतर काेणत्याही देशांमध्ये एवढे पर्याय उपलब्ध नाहीत, असे भूषण म्हणाले. nलसीच्या दाेन मात्रांमध्ये २८ दिवसांचे अंतर राहणार आहे. पहिली मात्रा दिल्यानंतर १४ दिवसांनी प्रतिकार शक्ती तयार हाेण्यास सुरुवात हाेते. त्यामुळे लस घेतल्यानंतर लगेचच आपण सुरक्षित झालाे, असे मानू नये. 

काेलकात्यात १० लाखसर्वाधिक सुमारे १० लाख लसी काेलकातामध्ये पाठविण्यात आल्या आहेत. त्यानंतर दिल्ली, बंगळुरू आणि पाटणा या शहरांमध्ये लसी पाठविण्यात आल्या आहेत. स्पाइसजेट, इंडिगाे आणि गाे एअरच्या विमानांमधून लसीची वाहतूक करण्यात येत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस