शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

व्यंकय्या नायडू देशाचे तेरावे उपराष्ट्रपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2017 10:39 IST

व्यंकय्या नायडू यांनी उपराष्ट्रपती पदाची  शपथ घेतली आहे

नवी  दिल्ली, दि. 11 - व्यंकय्या नायडू यांनी उपराष्ट्रपती पदाची शुक्रवारी शपथ घेतली आहे. व्यंकय्या नायडू हे देशाचे 13 वे राष्ट्रपती आहेत. राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यंकय्या नायडू यांना उपराष्ट्रपती पदाची शपथ दिली. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील उपस्थित होते.

5 ऑगस्ट रोजी झालेल्या निवडणुकीत नायडू यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांचा पराभव केला होता. राष्ट्रपतिपदापाठोपाठ उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतही भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बाजी मारली. 5 ऑगस्ट रोजी झालेल्या निवडणुकीत एनडीएचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार व्यंकय्या नायडू यांनी मोठया मताधिक्क्याने विजय मिळवला. पहिल्या फेरीपासून व्यंकय्या नायडू आघाडीवर होते.  एकूण 771 लोकप्रतिनिधींनी मतदानाचा हक्क बजावला. व्यंकय्या नायडू यांना 516 तर, विरोधी पक्षांचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांना 244 मते मिळाली होती. तर 11 मतं बाद गेली. या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने गोपाळकृष्ण गांधी यांना मतदान केले होते. 

शेतकरी कुटुंबातून आलेल्या व्यक्तीने उपराष्ट्रपती होणे हा सन्मान - व्यंकय्या नायडूउपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवल्यानंतर व्यंकय्या नायडू यांनी त्यांना पाठिंबा देणा-या सर्व खासदारांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली होती. सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेला मुलगा आज देशाचा उपराष्ट्रपती होतोय हा माझा  सन्मान आहे. देशाच्या संविधानाला सर्वोच्च मानून आणि माझ्या पूर्वसुरींनी ज्या परंपरा, मापदंड घालून दिलेत त्यानुसार काम करीन, अशी प्रतिक्रिया व्यंकय्या नायडू यांनी विजयानंतर दिली होती.  

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी