शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

दारू बाटल्यांवर मतदानाचा संदेश, टीका झाल्यावर निर्णय मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 04:21 IST

नागरिकांमध्ये मतदानाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी दारूच्या बाटल्यांवर स्टिकर्स लावण्याची शक्कल झाबुआ जिल्हा प्रशासनाने लढवली होती; परंतु चौफेर टीका झाल्यानंतर अखेर हा निर्णय मागे घ्यावा लागला.

झाबुआ : नागरिकांमध्ये मतदानाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी दारूच्या बाटल्यांवर स्टिकर्स लावण्याची शक्कल झाबुआ जिल्हा प्रशासनाने लढवली होती; परंतु चौफेर टीका झाल्यानंतर अखेर हा निर्णय मागे घ्यावा लागला. मध्य प्रदेशात २८ नोव्हेंबर रोजी निवडणुका होत आहेत. त्यामुळे तळागाळातील नागरिकांपर्यंत मतदानाचा संदेश पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दारू विक्रेत्यांना स्टिकर्स वितरित केले. त्यातील काहींनी ते स्टिकर्स दारूच्या बाटल्यांवर लावून त्यांची विक्रीही केली. न चुकता मतदान करण्याचा संदेश या बाटल्यांवर देण्यात आला होता. या निर्णयावर सर्व स्तरांतून टीका झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने हे स्टिकर्स दारू विक्रेत्यांकडून परत मागवले आहेत, असे उत्पादन शुल्क अधिकाऱ्याने सांगितले.विशेष म्हणजे २०१६ मध्ये बिहारमध्ये संपूर्ण दारूबंदी लागू करण्यात आल्यानंतर असाच निर्णय मध्यप्रदेशातही घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी तेव्हा जाहीर केला होता. नर्मदा नदीच्या काठावर पाच किलोमीटर अंतरातील दारूची अनेक दुकाने बंदही करण्यात आली होती. नर्मदा सेवा यात्रेच्या काळात त्यांनी निवडणुकांवर डोळा ठेवून राज्यात संपूर्ण दारूबंदीचे आश्वासनही दिले होते. असे असताना दारूच्या बाटल्यांवरच मतदान करण्याचा संदेश देणारे स्टिकर्स चिकटवण्याचा निर्णय घेण्यात आला, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.तथापि, राज्यात संपूर्ण दारूबंदी लागू करणार नाही, असे राज्याच्या वित्तमंत्र्यांनी नंतर जाहीर केले होते. असे केले तर राज्यातील आदिवासी समाजाच्या भावना दुखावतील, असा युक्तिवादही त्यांनी केला होता.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश