शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांनो, उमेदवार विसरा अन् मोदींच्या नावाने मते द्या - अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 19:06 IST

काँग्रेस आपली गादी राखण्याचा प्रयत्न करत असून भाजपा कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेसाठी प्रयत्नशील आहे. दरम्यान, एका प्रचारसभेदरम्यान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह​​​​​​​ यांनी उमेदवार विसरा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर मते द्या, असे आवाहन मतदारांना केले आहे. 

हुबळी : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची सध्या धामधूम सुरु आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजकीय पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे. भाजपा आणि काँग्रेसमध्ये थेट टक्कर पाहायला मिळणार आहे. काँग्रेस आपली गादी राखण्याचा प्रयत्न करत असून भाजपा कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेसाठी प्रयत्नशील आहे. दरम्यान, एका प्रचारसभेदरम्यान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी उमेदवार विसरा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर मते द्या, असे आवाहन मतदारांना केले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह राज्यातील अनेक ठिकांणी प्रचारसभा घेत आहे. दक्षिणा कन्नडा जिल्ह्यातील बंटवाल येथे आयोजित प्रचारसभेत अमित शाह यांनी भाषण केले. यावेळी ते कार्यकर्त्यांना म्हणाले, तुमचे कर्तव्य विधानसभा निवडणूक जिंकणे हे नाही तर तुमचे कर्तव्य मतदान विभाग जिंकणे आहे. जेव्हा असे अनेक बुथ आपण जिंकू तेव्हा निश्चितपणे ही निवडणूक आपण जिंकू. याचबरोबर अमित शाह म्हणाले, मतदारांनो, उमेदवारांकडे पाहू नका. फक्त कमळ चिन्ह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोकडे पाहा आणि मते द्या. 

राहुल गांधी 'बच्चा', 150 हून अधिक जागा जिंकू - बी.एस. येदियुरप्पा भाजपाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार बी.एस. येदियुरप्पा यांनी एका प्रचार सभेत काल राहुल गांधी यांच्यावर टीका केली. त्यांनी 'बच्चा' अशा शब्दात राहुल गांधी यांची खिल्ली उडवली. कर्नाटकात बच्चा (राहुल गांधी) आला आहे. मात्र, आम्हाला माहिती आहे की आम्ही विधानसभेच्या 150हून अधिक जागा जिंकू, अशा शब्दांत बी.एस. येदियुरप्पा यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. दरम्यान, सध्या कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सुद्धा कर्नाटकाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या अनेक प्रचार सभा सुरु असून त्यांनीही भाजपावर हल्लाबोल चढवला आहे. 

भाजपाकडून सत्याची अपेक्षा ठेवणे चुकीचेचबेल्लारी येथे झालेल्या प्रचारसभेत राहुल गांधी यांची भाजपावर हल्लाबोल केला होता. यावेळी म्हणाले की, भाजपा हा खोटे बोलणा-या मंडळींचा पक्ष असून, त्यांच्याकडून तुम्ही सत्याची अपेक्षा ठेवूच शकत नाही, तरुणांना रोजगार, शेतक-यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव, काळ्या पैशाला आळा, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये अशी सारीच भाजपा व नरेंद्र मोदी यांची आश्वासने खोटी ठरली आहेत, अशी टीका त्यांनी केली.  

टॅग्स :Amit Shahअमित शाहKarnatakकर्नाटकKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८