शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'वोट चोरी' हा देशद्रोही गुन्हा! महाराष्ट्रातील शाई प्रकरणावर राहुल गांधींचा प्रहार; म्हणाले- 'लोकशाहीवरील विश्वास उडाला!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 11:51 IST

"मत चोरी करणे हा देशद्रोही गुन्हा आहे," अशा शब्दांत राहुल गांधी यांनी संताप व्यक्त करत लोकशाहीच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी समोर आलेल्या पुसणाऱ्या शाईच्या प्रकरणाने आता राष्ट्रीय पातळीवर राजकीय वळण घेतले आहे. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून निवडणूक आयोगावर सडकून टीका केली आहे. "मत चोरी करणे हा देशद्रोही गुन्हा आहे," अशा शब्दांत राहुल गांधी यांनी संताप व्यक्त करत लोकशाहीच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

राहुल गांधींचे निवडणूक आयोगावर 'गॅसलाईटिंग'चे आरोप 

राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एका बातमीचा संदर्भ देत निवडणूक आयोगावर निशाणा साधला. ते म्हणाले की, "निवडणूक आयोग ज्या पद्धतीने नागरिकांची दिशाभूल करत आहे, त्यामुळे आपल्या लोकशाहीवरील विश्वास पूर्णपणे उडाला आहे. मत चोरी हा देशद्रोही गुन्हा आहे." राहुल गांधींच्या या विधानामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पारदर्शकतेवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

काय आहे 'पुसल्या जाणाऱ्या शाई'चे प्रकरण? 

गुरुवारी (१५ जानेवारी) मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या महापालिकांसाठी मतदान पार पडले. यावेळी मतदारांच्या बोटावर लावण्यात आलेली शाई सहजपणे पुसली जात असल्याचे अनेक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या मुद्द्यावरून प्रशासनाला धारेवर धरले होते. सॅनिटायझर, नेलपॉलिश रिमूव्हर किंवा साध्या अ‍ॅसिटोनने ही शाई निघत असल्याचा दावा विरोधकांनी केला होता.

उद्धव ठाकरेंची कडक भूमिका; निवडणूक आयुक्तांच्या निलंबनाची मागणी 

उद्धव ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. "निवडणूक आयुक्त उघडपणे सत्ताधारी भाजप-शिंदे गटाची बाजू घेत आहेत," असे म्हणत ठाकरेंनी त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. लोकशाहीचा खून करण्याचा हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण आणि चौकशीचे आदेश

वाढता वाद पाहून राज्य निवडणूक आयोगाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले की, "२०११ पासून आम्ही 'मार्कर पेन' स्वरूपातील शाई वापरत आहोत. ही शाई पुसली जाऊ शकते, हा दावा चुकीचा आहे. तरीही लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल." आयोगाने असेही म्हटले आहे की, केवळ शाई पुसली म्हणजे कोणी पुन्हा मतदान करू शकणार नाही, कारण मतदानाची नोंद लेखी स्वरूपातही केली जाते.

राजकीय वातावरण तापले 

वरळीसारख्या हाय-प्रोफाईल मतदारसंघात आदित्य ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागलेली असताना, मुंबईत शाईवरून झालेला हा गोंधळ महायुती आणि महाविकास आघाडीमधील वादाला अधिक धार देणारा ठरला आहे. आता राहुल गांधींनी यात उडी घेतल्याने हा मुद्दा संसदेतही गाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Rahul Gandhi calls vote theft treason over Maharashtra ink issue.

Web Summary : Rahul Gandhi criticized the Election Commission over erasable ink in Maharashtra's municipal elections, calling vote theft treason and questioning democratic processes. Allegations of bias and demands for investigation are escalating the political dispute between parties.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Rahul Gandhiराहुल गांधी