शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

आवाज माझाच; पण टेपमध्ये फेरफार; कुमारस्वामींकडून राजकारण - येदियुरप्पा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 05:25 IST

काँग्रेस आमदारांच्या सौदेबाजीसंबंधी कथित संभाषणाच्या वादग्रस्त ध्वनिफितींमधील आवाज आपलाच असल्याची कबुली कर्नाटकातील भाजपा नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांनी दिली आहे.

हुबळी : काँग्रेस आमदारांच्या सौदेबाजीसंबंधी कथित संभाषणाच्या वादग्रस्त ध्वनिफितींमधील आवाज आपलाच असल्याची कबुली कर्नाटकातील भाजपा नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांनी दिली आहे. मात्र, त्या ध्वनिफितीत फेरफार करून सोयीस्करपणे जारी केल्याचा दावाही त्यांनी केला आहे.राज्यातील आघाडी सरकार पाडण्याकरिता जनता दल (एस)चे आमदार नगनगौडा यांना आपल्या बाजूला वळविण्यासाठी त्यांचा मुलगा शरण गौडा याच्याशी येदियुरप्पांनी संभाषण केले होते. त्यावेळी काही कोटी रुपये देण्याचे प्रलोभनही दाखविले गेले, असा आरोप कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केला होता. त्या कथित संभाषणाच्या ध्वनिफितीही त्यांनी पत्रकारांसमोर उघड केल्या होत्या.यासंदर्भात येदियुरप्पा म्हणाले की, ध्वनिफीत प्रकरणाच्या निमित्ताने कुमारस्वामी अत्यंत घाणेरडे राजकारण करीत आहेत. देवदुर्ग सर्किट हाऊसमध्ये मी विश्रांती घेत असताना एक व्यक्ती मला भेटायला आली. त्यावेळी सौजन्य म्हणून मी शरणगौडांशी बोललो. त्यांच्या वडिलांना भाजपाकडे वळविण्याचे कारस्थान रचल्याचा कुमारस्वामी यांनी या संभाषणाच्या आधारे केलेला आरोप चुकीचा आहे. चित्रपटसृष्टीतील पूर्वानुभव असल्यामुळे कुमारस्वामी यांनी ही ध्वनिफीत संकलित केली असावी. माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी त्यांनी हा सारा खटाटोप केलेला आहे. शरण गौडा यांनी त्यांची व्यथा माझ्यासमोर मांडली होती; पण त्यावेळी माझ्या डोळ्यांवर झोप असल्याने त्यांना दुसऱ्या दिवशी भेटायला, या असे सांगितले होते.कुमारस्वामींविरोधातआज गौप्यस्फोट करणारयेदियुरप्पा म्हणाले की, आमदारकीच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री कुमारस्वामींनी २५ कोटी रुपये मागितल्याचा पुरावा माझ्याकडे असून, तो सोमवारी मी सभागृहात उघड करणार आहे.तसेच कुमारस्वामींवर कारवाई करण्याची मागणीही विधानसभा अध्यक्षांकडे केली जाईल. माझ्या विरोधात उघड केलेल्या ध्वनिफीत प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. त्यामुळे नेमके सत्य बाहेरयेईल.भाजपाची ३० कोटींची आॅफर - जेडीएस आमदारआमदारकीचा राजीनामा देऊन जनता दल (सेक्युलर) मधून बाहेर पडण्यासाठी मला भाजपने ३० कोटी रुपये देण्याची तयारी दर्शविली होती. त्यातील पाच कोटींचा पहिला हप्ता आपण स्वीकारलाही होता, असे आमदार के. श्रीनिवास गौडा यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले.ते म्हणाले की, मी पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे माझ्याकडे आलेल्या तीन भाजपा नेत्यांना सांगितले होते. हा सारा प्रकार मी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या कानावर घातला. भाजपा नेत्यांशी संपर्क साधून त्यांना पाच कोटी रुपये परत घेऊन जाण्यास सांगितले.

टॅग्स :Yeddyurappaयेडियुरप्पा