शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

व्हीके पांडियन यांची राजकारणातून निवृत्ती; नवीन पटनायक आणि BJD ची मागितली माफी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 17:29 IST

नवीन पटनायक यांचे उत्तराधिकारी मानले जाणारे व्हीके पांडियन यांनी BJD च्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली.

VK Pandian Quits Politics : आज एकीकडे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत, तर दुसरीकडे ओडिशात (Odisha) मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. लोकसभा आणि ओडिशातील विधानसभा निवडणुकीत नवीन पटनायक (Naveen Patnaik) यांच्या बिजू जनता दलाचा (BJD) दारुण पराभव झाल्यानंतर आता त्यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले बीजेडीचे नेते व्हीके पांडियन (VK Pandian) यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. 

पांडियन बीजेडीच्या बैठकीलाही उपस्थित नव्हतेव्हीके पांडियन यांनी एक व्हिडिओ जारी करुन आपला निर्णय जाहीर केला. व्हीके पांडियन हे माजी मुख्यमंत्री पटनायक यांचे उत्तराधिकारी मानले जात होते. पण, बीजेडीच्या पराभवानंतर पांडियन यांच्यावर टीकेची झोड उठली. विशेष म्हणजे, व्हीके पांडियन 5 जून रोजी नवीन पटनायक यांच्यासोबत राजीनामा देण्यासाठी राजभवनातही गेले नाहीत आणि त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पक्षाच्या बैठकीलाही उपस्थित राहिले नाहीत. 

काय म्हणाले पांडियन?पांडियन यांनी व्हिडिओ जारी करुन म्हटले की, "राजकारणात येण्याचा माझा उद्देश फक्त नवीन बाबू यांना पाठिंबा देणे हा होता. आता मी सक्रिय राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रवासात माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मी त्याबद्दल माफी मागतो. माझ्या विरोधात सुरू केलेल्या चुकीच्या नरेटिव्हमुले निवडणुकीत बीजेडीचे नुकसान झाले, त्यामुळे मी संपूर्ण बीजेडी परिवाराची माफी मागतो. बीजेडीच्या लाखो कार्यकर्त्यांना शुभेच्छा."

ओडिशा लोकसभा-विधानसभा निवडणुकीचे निकालओडिशा विधानसभा निवडणुकीत बीजेडीला भाजपकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. विधानसभेत 78 जागा जिंकून भाजपने बीजेडीची 24 वर्षांची सत्ता संपवून लावली. नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखालील बीजेडीला 51 जागा मिळाल्या, तर काँग्रेसने 14, माकपने एक जागा जिंकली. विशेष म्हणजे, बीजेडीला लोकसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही. दुसरीकडे भाजपने राज्यात लोकसभेच्या 20 जागा काबीज केल्या, तर काँग्रेसने एक जागा जिंकली.

टॅग्स :Odishaओदिशाlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालBiju Janata Dalबिजू जनता दल