शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

Vizag Gas Leak: विशाखापट्टणम रासायनिक कारखान्यातील शोकांतिका; वायुगळतीने ११ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2020 2:59 AM

Visakhapatnam, Vizag Gas Leakage News: या वायू गळतीने भोपाळमध्ये युनियन कार्बाईडच्या कारखान्यात २ डिसेंबर १९८४ रोजी रात्री घडलेल्या भयंकर वायुकांडाच्या कटू आठवणी जाग्या झाल्या.

विशाखपट्टणम/नवी दिल्ली : विशाखापट्टणम येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या रासायनिक कारखान्यात झालेल्या वायू गळतीमुळे ११ जणांचा मृत्यू झाला असून, एक हजारांहून अधिक लोकांना विषबाधा झाली. गुरुवारची पहाट उजाडण्याआधीच बुधवारच्या उत्तररात्री २.३० वाजता ही शोकांतिक घडली. गळती होताच हा विषारी वायू कारखान्याच्या आसपासच्या पाच किलोमीटरच्या परिसरातील गावांत पसरला. विषबाधा होऊ नये म्हणून धावपळ करण्याच्या प्रयत्नात अनेक जण बेशुद्ध होऊन पदपथ, रस्त्यांवर आणि रस्त्यालगच्या खड्ड्यात कोसळले. या वायू गळतीने भोपाळमध्ये युनियन कार्बाईडच्या कारखान्यात २ डिसेंबर १९८४ रोजी रात्री घडलेल्या भयंकर वायुकांडाच्या कटू आठवणी जाग्या झाल्या. भोपाळ वायू दुर्घटनेत तीन हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला होता.

आर.आर. वेंकटपुरम गावानजीक असलेल्या एल.जी. पॉलिमर कारखान्यातून रात्री २.३० वाजता स्टायरिन वायूची गळती सुरू झाल्यानंतर या विषारी वायूची बाधा झाल्याने अनेक जण बेशुद्ध पडले. वायू गळती झाल्याचे कळताच जीव वाचविण्यासाठी अनेकांनी सुरक्षित ठिकाणी पळ काढण्याचा प्रयत्न केला. श्वास गुदमरल्याने अनेक जण जागीच बेशुद्ध होऊन पडले. या धावपळीत कुपनलिकेत पडून दोन बालक, एक वैद्यकिय विद्यार्थी आणि अन्य दोघांचा मृत्यू झाला. लॉकडाऊनंतर हा कारखाना सुरू होण्याच्या तयारीत असताना ही वायू दुर्घटना घडल्याने मोठ्या औद्योगिक आपत्तीची भीती वाढली आहे.

वीस जणांना कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आल्याने मृतांची संख्या वाढू शकते. शिवाय २४६ जणांवर विशाखापट्टणम येथील किंग जॉर्ज इस्पितळात उपाचार केले जात आहेत. वायू गळती घडलेल्या परिसरातून ८०० लोकांना सुरक्षितपणे दुसरीकडे हलविण्यात आले. भरझोपेतच असताना ही दुर्घटना घडल्याने अनेकांनी जीव वाचविण्याकरिता मदतीसाठी टाहो फोडला, तर अनेक जण झोपेतच बेशुद्ध झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्रालय आणि राष्टÑीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून स्थितीचा आढावा घेतला. सर्व जण सुखरूप राहोत, अशी मी प्रार्थना करतो, असे पंतप्रधान मोदी यांनी टष्ट्वीट केले. राष्टÑपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी दु:ख व्यक्त करून या दुर्घटनेतील मृतांप्रती शोक व्यक्त केला. वायू गळती कमी करण्यात आली असली तरी एनडीआरएफचे जवान वायू गळती पूर्णत: बंद होईपर्यंत घटनास्थळी असतील, असे राष्टÑीय आपत्ती निवारण दलाचे महासंचालक एस.एन. प्रधान यांनी सांगितले.

गुजरात देणारआंध्रला विशेष रसायनअहमदाबाद : आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणममध्ये झालेल्या वायू गळतीचा परिणाम नाहीसा करण्यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी पीटीबीसी (पॅरा टर्शियरी ब्युटिल कॅटेकोल) हे विशेष ५०० किलोग्रॅम रसायन लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. या रसायनाची मागणी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी गुजरातकडे केली होती. हे रसायन फक्त वापी (जिल्हा वलसाड, दक्षिण गुजरात) येथेच तयार होते. या रसायनाचा उपयोग त्याची गळती व फैलाव रोखण्यासाठी होतो. हे रसायन दमण येथून विमानाने वापीला आणले जाईल व तेथून ते रस्ता मार्गाने घटनास्थळी पाठविले जाईल.

कारखान्याच्या व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हाअकरा जणांचा जीव घेणाºया या वायुदुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी कारखाना व्यवस्थापनासविरुद्ध भादंवि कलम ३०४, ३३७ आणि ३३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, आंध्र प्रदेश उच्च न्यायलयाने या दुर्घटनेची दखल घेत राज्य आणि केंद्र सरकारला नोटीस जारी केली आहे.

1800 किलोलिटर रसायन एका टाकीत असते. यापैकी एका टाकीतून वायू गळती झाली. दरम्यान, दक्षिण कोरियाचे राजदूत शीन बाँग किल यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. दुर्घटनेची बातमी कळताच धक्का बसला. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. कंपनीही चौकशी करीत आहे.भोपाळमधील युनियन कार्बाईडच्या कीटकनाशक कारखान्यातून २-३ डिसेंबर, १९८४ च्या रात्री गळती झालेल्या मिथाईल आयसोसायनेट (मिक) या वायूमुळे जवळपास सहा लाख लोकांना त्याचा त्रास झाला. किती लोकांना वायुबाधा झाली हा आजही वादाचाच विषय आहे. भारत सरकारने अधिकृतरीत्या हे मान्य केले की या वायूची बाधा ५,७४,००० लोकांना झाली व त्यापैकी ५,३०० मरण पावले.दोनपैैकी एका टाकीतून गळतीस्टायरीन हा रासायनिक पदार्थ सिंथेटिक रबर आणि रेझिन तयार करण्यासाठी वापरला जातो. घसा, त्वचा, डोळे आणि अन्य अवयवांसह चेतासंस्थेवर त्यांचा परिमाण होतो. या कारखान्यात स्टायरीन रसायनाच्या दोन टाक्या आहेत.