शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

BSNL च्या संचालकांचा 'नवाबी' थाट! अंतर्वस्त्रांच्या खरेदीपासून कंगव्यापर्यंत ५० अधिकाऱ्यांना कामाला लावलेले, कारणे दाखवा नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 14:20 IST

Vivek Banjal BSNL Prayagraj Protocol Controversy: BSNL चे संचालक विवेक बंजल यांच्या प्रयागराज दौऱ्यात अंतर्वस्त्रे आणि तेलासाठी ५० अधिकाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली होती. या 'शाही' प्रोटोकॉलवरून आता त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी बीएसएनएलचे संचालक विवेक बंजल यांचा प्रयागराज दौरा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या दौऱ्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी तयार केलेला अजब आणि अतिशय 'विस्तृत' प्रोटोकॉल सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठी टीका झाली होती. आता या प्रकरणाची गंभीर दखल घेत कंपनीने विवेक बंजल यांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावली असून ७ दिवसांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

विवेक बंजल १९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रयागराजला भेट देणार होते. या दौऱ्यासाठी तब्बल ५० हून अधिक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांमध्ये चक्क खालील बाबींचा समावेश होता. 

वैयक्तिक वस्तूंची सोय: टॉवेल, कंगवा, हेअर ऑईल इतकेच नव्हे तर अंतर्वस्त्रांची खरेदी करण्यासाठीही अधिकाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली होती.

संगम स्नान किट: संचालकांच्या संगम स्नानासाठी ६ पुरुष आणि २ महिलांना 'स्नान किट' तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

खाद्यपदार्थ आणि लक्झरी: चोख नाश्ता, जेवण आणि प्रवासासाठी पांढरे टॉवेल असलेल्या आलिशान गाड्यांची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले होते.

सोशल मीडियावर टीकेची झोड आणि दौरा रद्दज्या वेळी बीएसएनएल हजारो कोटींच्या तोट्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे, अशा वेळी एका संचालकाच्या वैयक्तिक आरामासाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि संसाधनांचा असा वापर पाहून नेटिझन्सने संताप व्यक्त केला. वाद वाढल्यानंतर तातडीने हा दौरा रद्द करण्यात आला आणि संबंधित प्रोटोकॉल अवैध घोषित करण्यात आला.

आता ७ दिवसांत उत्तर द्यावे लागणारया प्रकारामुळे बीएसएनएलच्या प्रतिमेला तडा गेल्याचे मानले जात आहे. प्रशासनाने याला 'शिस्तभंग' मानले असून, बंजल यांना बजावलेल्या नोटीसमध्ये या सर्व प्रकारावर खुलासा मागितला आहे. जर समाधानकारक उत्तर मिळाले नाही, तर त्यांच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BSNL Director's Lavish Trip Sparks Outrage, Faces Disciplinary Action

Web Summary : BSNL director's extravagant trip, involving excessive personal service requests, triggered public anger. Facing scrutiny for misuse of resources, he received a show-cause notice demanding explanation within seven days, potentially leading to disciplinary action.
टॅग्स :BSNLबीएसएनएल