शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
4
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
5
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
6
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
7
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
8
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
9
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
10
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
11
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
12
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
13
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
14
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
15
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?
16
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
17
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
18
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
19
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
20
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा

विठ्ठलाला दीड कोटीच्या देणग्या

By admin | Updated: August 2, 2015 22:55 IST

आषाढी यात्रा : विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला २.२१ कोटींचे उत्पन्न

आषाढी यात्रा : विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला २.२१ कोटींचे उत्पन्न
सचिन कांबळे / सुनील शिवशरण
पंढरपूर :
पंढरीच्या सावळ्या विठ्ठलाच्या चरणी आषाढीच्या कालावधीत दक्षिणापेटीत ३९ लाख ८ हजार १७ रुपये, तर देणगीद्वारे १ कोटी २० लाख ९८ हजार ७८८ रुपये असे एकूण १ कोटी ६० लाख ६ हजार ८०५ रुपयांचे दान भाविकांनी अर्पण केले.
यंदा १२ लाख भाविकांनी आषाढीला पंढरीत हजेरी लावली. आषाढी यात्रेत आलेल्या भाविकांनी विठ्ठलाच्या चरणावर ३२ लाख ६७ हजार ६३६ रुपयांचे तर रुक्मिणी मातेच्या पायावर ६ लाख ४० हजार ३८१ रुपयांचे दान अर्पण केले. तसेच अन्नछत्रासाठी ८३ हजारांची देणगी तर विठ्ठल-रुक्मिणीला १ कोटी २० लाख ९८ हजार ७८८ देणगी दिली आहे. विविध वस्तू व साहित्य विक्रीतून मंदिर समितीला ६१ लाख ८० हजार ७२० रुपयांचे उत्पन्न मिळाले.
विठ्ठल-रुक्मिणीला दान व देणगीतून १ कोटी ६० लाख ६ हजार ८०५ रुपये व प्रसाद व वस्तूंच्या विक्रीतून ६१ लाख ८० हजार ७२० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यामुळे यंदाच्या वर्षी मंदिर समितीला २ कोटी २१ लाख ८७ हजार ५२५ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
कोट -
विठ्ठल-रुक्मिणी मातेला मागील वर्षी २ कोटी १३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यावर्षी २ कोटी २१ लाख ८७ हजार २५२ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यंदाच्या वर्षी ८ लाख ८७ हजार ५२५ रुपयांचे जादा उत्पन्न मिळाले आहे.
- शिवाजी कादबाने
कार्यकारी अधिकारी, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूऱ

चौकट
दहा दिवसांत रेल्वेला कोटीचा फायदा
आषाढी यात्रा कालावधीत विठुरायाच्या चरणी लीन होण्यासाठी येणार्‍या भाविकांची सोय व्हावी म्हणून मध्य रेल्वे विभागाने जादा गाड्यांच्या १०२ फेर्‍या केल्या. यातून २ लाख १९ हजार भाविकांनी प्रवास केल्याने रेल्वेला १ कोटी २ हजार २०३ रुपयांचे उत्पन्न मिळाले. केवळ दहा दिवसांच्या काळात रेल्वेला हे वाढते उत्पन्न मिळाले.