शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

हमासमधील दहशतवाद्यांची ट्रिक छत्तीसगडच्या नक्षलवाद्यांनी वापरली; पोलिसांकडून सुरुंग उद्धवस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 13:14 IST

३० जानेवारी २०२४ रोजी नक्षलवाद्यांनी सुकमा आणि बिजापूर जिल्ह्यांच्या सीमेवर बांधलेल्या नवीन सुरक्षा छावणीवर हल्ला केला होता.

नवी दिल्ली: हमासच्या दहशतवाद्यांप्रमाणे छत्तीसगडमधील दंतेवाड्यात नक्षलवाद्यांनी सुरुंग तयार केल्याचे समोर आले आहे. दंतेवाडा हा छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त जिल्हा आहे. जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १४ हजारांहून कमी आहे. आजूबाजूला घनदाट जंगले आहेत. जे नक्षलवाद्यांना आश्रय देतात. या जंगलातून नक्षलवादी बाहेर पडून आपल्या पोलीस आणि निमलष्करी दलांवर हल्ला करतात. 

नक्षलवाद्यांनी दंतेवाड्यात हमासच्या दहशतवाद्यांप्रमाणे सुरुंग केले आहेत. असाच एक सुरुंग दंतेवाडा पोलिसांनी उघड केला आहे. त्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. पोलिसांनी ही सुरुंग उद्धवस्त केला आहे. व्हिडीओमध्ये सुरुंगाची खोली दिसत आहे. सुरुंग बरीच लांब आहे. मधल्या सुरुंगाध्ये मोकळी जागा ठेवण्यात आली आहे. जेणेकरून नक्षलवादी त्यातून बाहेर पडून सुरक्षा दलांवर हल्ला करू शकतील. हे सुरुंग लपविण्यासाठी लाकडाचा वापर केला जातो. 

३० जानेवारी २०२४ रोजी नक्षलवाद्यांनी सुकमा आणि बिजापूर जिल्ह्यांच्या सीमेवर बांधलेल्या नवीन सुरक्षा छावणीवर हल्ला केला होता. यामध्ये तीन CRPF जवानांना शहीद झाले. त्यापैकी दोघे कोब्रा बटालियनचे होते. याशिवाय १४ जवान जखमी झाले आहेत. अशा परिस्थितीत हे बोगदे शोधणे ही अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. यापूर्वी २०२१मध्ये याच ठिकाणी चकमक झाली होती. त्यावेळी २३ जवान शहीद झाले होते. नवीन सुरक्षा शिबिर बांधल्यानंतर, कोब्रा कमांडो, विशेष टास्क फोर्स आणि जिल्हा राखीव गार्ड यांच्या पथकांनी नक्षलविरोधी अभियान सुरू केले.

नक्षलवाद्यांनी पहिल्यांदाच असे सुरुंग केले 

असे सुरुंग नक्षलवाद्यांमध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा बोगदा दंतेवाडा-विजापूर सीमेवर बांधण्यात आला होता. हवाई हल्ले टाळण्यासाठी हमासने इस्रायलमध्ये असे सुरुंग बांधले होते. यापूर्वी कधीही नक्षलवाद्यांमध्ये असे सुरुंग दिसले नसल्याची चर्चा सुरक्षा विभागात आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीChhattisgarhछत्तीसगड