शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
2
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
3
काबाडकष्ट करून बायकोला शिकवलं; नर्स बनताच ती म्हणाली, "आता तू मला आवडत नाहीस", खरं करण कळताच पती हादरला!
4
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
5
Stock Market Today: आधी तेजी मग घसरण, शेअर बाजारात चढ-उतार; मेटल क्षेत्रात दिसली तेजी
6
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
7
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
8
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
9
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
10
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
11
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
12
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
13
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
14
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
15
Mumbai: विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेची जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव
16
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
17
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
18
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
19
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
20
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे

विदर्भाच्या निर्मिती-विकासासाठी व्हिजन हवे- रमण सिंह

By admin | Updated: May 22, 2016 21:48 IST

लहान राज्यांमध्ये वेगवान विकासाची क्षमता असते. वेगळ्या विदर्भाबाबत तेथील राजकारणी निर्णय घेतील.

योगेश पांडेकवर्धा (छत्तीसगड), दि. 22- आपल्या देशात विदर्भासह विविध लहान राज्यांची मागणी समोर येत आहे. लहान राज्यांमध्ये वेगवान विकासाची क्षमता असते. वेगळ्या विदर्भाबाबत तेथील राजकारणी निर्णय घेतील. विदर्भामध्ये खरोखरच विकासाची प्रचंड क्षमता आहे. परंतु यासाठी केवळ मोठमोठ्या गोष्टी करण्यात अर्थ नाही. यासाठी योग्य दृष्टिकोन आणि प्रभावी नेतृत्व आवश्यक आहे, असे मत छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह यांनी व्यक्त केले. छत्तीसगड शासनाच्या लोकसुराज मोहिमेदरम्यान त्यांनी लोकमतशी विशेष संवाद साधला.वेगळ्या छत्तीसगड राज्याची निर्मिती व्हावी यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आवाज उचलला होता. विदर्भात साधनसंपत्ती उपलब्ध आहे. त्यामुळे वेगळे राज्य म्हणून विकासाची प्रचंड संधी आहे. परंतु यासाठी विधिमंडळातून वेगळ्या राज्याचा प्रस्ताव जायला हवा. राज्यनिर्मितीचा हा पहिला टप्पाच जास्त सर्वात जास्त महत्त्वाचा असतो, याकडे डॉ. रमण सिंह यांनी लक्ष वेधले. छत्तीसगडची निर्मिती झाली त्यावेळी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. परंतु उपलब्ध साधनसंपत्तीच्या जोरावर आमची विकासाकडे वाटचाल सुरू आहे. सहा हजार कोटींपासून सुरू झालेला अर्थसंकल्प आता ७६ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे, असे त्यांनी सांगितले.बस्तरमधली ती घटना दुर्दैवीनक्षलप्रभावित बस्तरमध्ये काही दिवसांपूर्वी जेएनयूमधील प्राध्यापकांनी जाऊन गावकऱ्यांना प्रशासनाविरुद्ध भडकविण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण समोर आले. संबंधित प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. आदिवासी क्षेत्रातील लोकांना सरकारविरोधात करण्याचे काही बुद्धिजिवी प्रयत्न करत आहेत. परंतु असे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत असा दावा त्यांनी केला. प्रशासन आदिवासींना त्रास देत असल्याचा कांगावा नक्षलसमर्थक करतात. परंतु जर सरकार आदिवासी नागरिकांच्या विरोधात असते तर त्यांनी आम्हालाच सलग तीनवेळा कसे निवडून दिले असते, असा प्रश्न डॉ.सिंह यांनी उपस्थित केला.नक्षलवाद्यांच्या समर्थनात घट, आदिवासींना हवा विकासगेल्या काही वर्षांपासून नक्षलप्रभावित बस्तर, सरगुजा, जगदलपूर या भागातील आदिवासी नागरिकांमध्ये जागरूकता येत आहे. त्यांनादेखील रस्ते, वीज, पाणी, रोजगार हा विकास अपेक्षित आहे. नक्षलवाद्यांना गावकऱ्यांकडून मिळणाऱ्या समर्थनात घट होत आहे, असा दावा डॉ.रमण सिंह यांनी केला. सरगुजामधील नक्षलवाद्यांचा प्रभाव फारच कमी झाला आहे. बस्तरमध्येदेखील आम्हाला ७० ते ८० टक्के यश मिळाले आहे. प्रशासनाला नागरिकांचे चांगले सहकार्य मिळत असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.