शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदी विष्णु सदाशिव कोकजे, प्रवीण तोगडियांना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2018 17:41 IST

विष्णु सदाशिव कोकजे यांची विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - विष्णु सदाशिव कोकजे यांची विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपद निवडीबाबत शनिवारी (14 एप्रिल) मतदान प्रक्रिया पार पडली. मिळालेल्या माहितीनुसार, 273 प्रतिनिधींपैकी 132 प्रतिनिधींनी मतदान केले आहे. सकाळी 11.40 वाजण्याच्या सुमारास सुरू झालेली मतदान प्रक्रिया दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास संपली. निवडणुकीचे निकाल दुपारी 3 वाजण्याच्या सुमारस जाहीर करण्यात आले. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे व्हिडीओ रेकॉर्डिंगदेखील करण्यात आले आहे. 

केवळ प्रवीण तोगडिया यांची उचलबांगडी करण्याच्या उद्देशानं 52 वर्षांनंतर पहिल्यांदाच विहिंपच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक घेण्यात आली होती, असे म्हटले जात आहे. व या प्रयत्नात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यशदेखील मिळाले आहे. दरम्यान, निवडणुकीमध्ये विष्णु सदाशिवम् कोकजे यांना 192 पैकी 131 मतं मिळाली. तर प्रवीण तोगडिया यांचे समर्थक राघव रेड्डी यांना 60 मतं मिळाली असून यातील एक मतं अवैध ठरवण्यात आले. 

तोगडियांनी लावला बोगस मतदारांचा आरोप 52 वर्षांत प्रथमच विहिंपमध्ये अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आल्यानं ही निवडणूक विशेष अशी ठरली. सोबतच प्रवीण तोगडिया यांचे भाजपा व आरएसएससोबत असलेल्या नात्यात कटुता आल्यानं अध्यक्षपदी नेमके कोण विराजमान होणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. दरम्यान, निवडणुकीपूर्वीच विहिंपच्या मतदार यादीमध्ये 40 बोगस मतदार असल्याचा आरोप तोगडिया यांनी केला होता.

दरम्यान, डिसेंबर 2017 मध्ये तोगडिया आणि रेड्डी यांच्या पदाचा कार्यकाळ संपला होता. त्यानंतर नवीन अध्यक्षांच्या निवडीसाठी 29 डिसेंबर 20017ला भुवनेश्वरमध्ये बैठकदेखील  झाली होती.  मात्र तोगडिया आणि त्यांच्या समर्थकांनी गोंधळ घालत कोकजे यांच्या नावाला विरोध केला होता.   

टॅग्स :praveen togadiaप्रवीण तोगडियाNarendra Modiनरेंद्र मोदी