शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

कृष्णा नदीच्या काठावर चमत्कार, भगवान विष्णूची 1000 वर्षे जुनी 'रामलला' सारखी मूर्ती सापडली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 15:16 IST

सध्या भगवान विष्णूची मूर्ती आणि शिवलिंग भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (ASI) ताब्यात घेतले आहे.

तेलंगणा-कर्नाटक सीमेजवळ कृष्णा नदीच्या काठावर शतकानुशतके जुनी विष्णू मूर्ती आणि शिवलिंग सापडले आहे. कर्नाटकातील रायचूर येथे पुलाच्या बांधकामादरम्यान ही मूर्ती सापडली आहे. याठिकाणी सापडलेल्या मूर्ती 11 व्या किंवा 12 व्या शतकातील असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे, सापडलेली विष्णूची मूर्ती ही अयोध्येतील राम मंदिरात प्रतिष्ठापणा केलेल्या रामललासारखी आहे. दशावताराच्या मूर्तीभोवती एक आभामंडळ आहे, ज्यावर भगवान विष्णूचे सर्व अवतार कोरलेले आहेत.

सध्या भगवान विष्णूची मूर्ती आणि शिवलिंग भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (ASI) ताब्यात घेतले आहे. मूर्ती आणि शिवलिंगाचे परीक्षण होणार आहे. मात्र, ही मूर्ती जवळपास एक हजार वर्षे जुनी असल्याचा अंदाज आहे. रायचूर विद्यापीठातील प्राचीन इतिहास आणि पुरातत्व विभागाच्या प्राध्यापिका डॉ. पद्मजा देसाई यांनी सांगितले की, भगवान विष्णूची मूर्ती मंदिराच्या गर्भगृहाचा भाग असावी. याशिवाय, मंदिरावर हल्ला आणि तोडफोड केल्यानंतर भाविकांनी मूर्ती वाचवण्यासाठी तिला नदीत फेकले असावे, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.

प्राध्यापिका डॉ. पद्मजा देसाई यांनी सांगितले की, भगवान विष्णूची मूर्ती ही अयोध्येतील रामललासारखी आहे. आभामंडळावर मत्स्य, कूर्म, नरसिंह, वामन, राम, परशुराम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की असे  भगवान विष्णूचे सुंदर 10 अवतार कोरलेले आहेत. तसेच, उभ्या असलेल्या मूर्तीला चार हात आहेत, त्यापैकी दोन हात शंख आणि चक्राने सुशोभित आहेत. दोन हात खाली तोंड करून आशीर्वाद मुद्रेत आहेत. या मूर्तीवर भगवान विष्णूचे वाहन गरुडाचे चित्रण नाही.

अयोध्येत अरुण योगीराज यांनी बनवलेल्या मूर्तीची निवड!कर्नाटकातील म्हैसूर येथील रहिवासी शिल्पकार अरुण योगीराज यांनी प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्येतील बांधलेल्या भव्य राम मंदिरासाठी मूर्ती तयार केली होती. सहा महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर त्यांनी पाच वर्षांच्या रामललाची मूर्ती फायनल केली. त्यांच्या हातांनी बनवलेल्या मूर्तीची निवड श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने गर्भगृहात अभिषेक करण्यासाठी केली होती. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरKarnatakकर्नाटक