शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आंध्र प्रदेशची नवी राजधानी विशाखापट्टणम असणार, मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 16:09 IST

Vishakhapatnam to be new Andhra Pradesh capital : आता आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती (Amravati) असणार नाही.

विशाखापट्टणम : दक्षिण भारतीय राज्य आंध्र प्रदेशची (Andhra Pradesh) राजधानी बदलण्यात आली आहे. आता आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती (Amravati) असणार नाही. विशाखापट्टणम  (Visakhapatnam) ही आंध्र प्रदेशची नवी राजधानी म्हणून ओळखली जाणार आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (Chief Minister Jagan Mohan Reddy) यांनी मंगळवारी  मोठी घोषणा केली आहे. 

वृत्तसंस्था एएनआयच्या म्हणण्यानुसार, आंध्र प्रदेशसाठी नवीन राजधानीची घोषणा नऊ वर्षांनंतर करण्यात आली आहे. तेव्हा तेलंगणा राज्याला आपल्या प्रदेशातून वेगळे केले होते आणि हैदराबादला त्याची राजधानी म्हणून देण्यात आले होते. दिल्लीतील एका कार्यक्रमात वायएसआर काँग्रेसचे प्रमुख आणि मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी म्हणाले, "मी तुम्हाला विशाखापट्टणम येथे आमंत्रित करतो, जी आगामी काळात आमची राजधानी बनणार आहे. येत्या काही महिन्यांत मी स्वतः विशाखापट्टणमला शिफ्ट होणार आहे."

याचबरोबर, मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी म्हणाले की, "आम्ही जागतिक शिखर परिषदेचे आयोजन करत आहोत. हे 3 आणि 4 मार्च रोजी विशाखापट्टणम येथे होणार आहे. मी तुम्हा सर्वांना या शिखर परिषदेसाठी वैयक्तिकरित्या आमंत्रित करत आहे. तुम्हा सर्वांना विनंती आहे की, तुम्ही फक्त इथेच न येता तुमच्या परदेशातील सहकाऱ्यांसमोर याविषयी चांगले मत मांडा."

दरम्यान, दिल्लीत आंतरराष्ट्रीय राजनैतिक आघाडीच्या बैठकीत मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी बोलत होते. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी विदेशी आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांनी येथे येऊन आंध्र प्रदेश राज्यात व्यवसाय करणे किती सोपे आहे, ते पाहावे, असे आवाहन केले आहे.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेश