शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

विराट कोहली देशविरोधी, त्यांच्याकडून काय प्रेरणा घ्यायची - भाजपा आमदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 18:43 IST

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी लग्नासाठी इटलीची निवड केली म्हणून एका भाजपा आमदाराने विराटच्या देशभक्तीबद्दलच शंका उपस्थित केली आहे.

ठळक मुद्देकोहलीकडून कशी प्रेरणा घेणार, जे देशाप्रती एकनिष्ठ आहेत त्यांच्याकडून आपण प्रेरणा घेतो.विराट कोहलीला टार्गेट करणे हा गुजरात निवडणूक निकालाचा परिणाम आहे अशी प्रतिक्रिया विरोधीपक्षात असलेल्या काँग्रेसने व्यक्त केली.  

गुना - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी लग्नासाठी इटलीची निवड केली म्हणून एका भाजपा आमदाराने विराटच्या देशभक्तीबद्दलच शंका उपस्थित केली आहे. विराटने इटलीमध्ये लग्न केले त्यामुळे तो देशभक्त नाही. विराटने भारतात नाव आणि पैसे कमावला पण त्याने इटलीमध्ये लग्न केले. भगवान राम, भगवान कृष्ण यांनी भारतामध्ये लग्न केले पण विराटने लग्न इटलीत जाऊन केले. तो राष्ट्र भक्त असू शकत नाही असे भाजपा आमदार पन्ना लाल शाक्या म्हणाले. मध्य प्रदेशातील गुना मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. 

कोहलीकडून कशी प्रेरणा घेणार, जे देशाप्रती एकनिष्ठ आहेत त्यांच्याकडून आपण प्रेरणा घेतो. अनुष्का शर्माला सुद्धा हीच बाब लागू पडते असे शाक्या म्हणाले. इटलीच्या नृत्यांगना भारतात येऊन करोडपती-अब्जोपती होतात. तेच कोहली देशाचा पैसा बाहेर घेऊन गेला. 12 डिसेंबरला इटलीच्या बोर्गो फिनोचितो हॉटेलमध्ये विराट-अनुष्का दोघे विवाहबद्ध झाले. या लग्नाला दोन्ही कुटुंब आणि ठराविक मित्र परिवार उपस्थित होता.

थेट विराट कोहलीला टार्गेट करणे हा गुजरात निवडणूक निकालाचा परिणाम आहे अशी प्रतिक्रिया विरोधीपक्षात असलेल्या काँग्रेसने व्यक्त केली.  

जाणून घ्या विराटच्या विवाहाबद्दल विराटचा इटलीच्या ज्या बोर्गो फिनोचितो हॉटेलमध्ये विवाह झाला. ते  हॉटेल अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या आवडीचं हॉटेल म्हणूनही ओळखलं जातं. जगातल्या 20 महागड्या हॉटेल्सपैकी ते एक आहे.  नवी दिल्लीत 21 डिसेंबरला ग्रँड रिसेप्शन होणार आहे तर मुंबईत 26 डिसेंबर रोजी दोघांच्या मित्रांसाठी खास रिसेप्शन असणार आहे.

''आज आम्ही एकमेकांसोबत कायमस्वरूपी प्रेमबंधनात अडकण्याचं आश्वासन घेतलं....हे वृत्त तुमच्यासोबत शेअर करताना मनापासून खूप आनंद होतोय... हा दिवस कुटुंबिय, मित्र-मैत्रिणी आणि चाहत्यांच्या शुभेच्छांनी आणखी खास होईल...आमच्या जीवन प्रवासातील महत्वाचा हिस्सा राहिल्याबद्दल सर्वांचे आभार'' असं ट्विट दोघांनी केलं होतं'  

टॅग्स :Virat Anushka Weddingविराट अनुष्का लग्न