शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आल्यानंतर उभे न राहिल्याने डॉक्टरवर कारवाई; हायकोर्टानं काढली सरकारची खरडपट्टी, म्हणाले...
2
पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांकडून हत्येचा गंभीर आरोप, वरळी पोलीस ठाण्यात आक्रोश
3
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
4
VIDEO: तुझे लागे न नजरिया... श्रेयंका अन् जेमिमाचा 'टीम इंडिया'च्या पोरींसोबत भन्नाट डान्स
5
"लढाई करून जिंकण्याचा दम नाही म्हणूनच..."; दिल्ली स्फोटावरून लष्करप्रमुख द्विवेदींनी पाकिस्तानचे काढले वाभाडे
6
५ डॉक्टरांनी २६ लाख जमवले; दिल्लीतील स्फोट फक्त ट्रेलर, अनेक शहरांत हल्ल्याची योजना, NIA चा खुलासा
7
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
8
VIDEO: स्मृती मंधानाचा होणाऱ्या पतीसोबत अफलातून डान्स, लग्नाआधी 'संगीत'मध्ये तुफान धम्माल
9
मेहनती आहात, सातत्याने काम करता तरीही तुमचे करिअर 'स्लो' झालेय?; तुम्ही ५ 'ट्रॅप'मध्ये अडकलात
10
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
11
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
12
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
13
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
14
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
15
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
16
उसाच्या फडातून येतो गुरगुरण्याचा आवाज अन् उडतो जिवाचा थरकाप; शेतात मजूर मिळेनात
17
देवदर्शनाचा प्रवास अंतिम ठरला! टायर फुटला अन् ३ निष्पाप ठार; अणदूरनजीक दुर्घटनेत ११ गंभीर जखमी
18
दिवाळखोरीच्या आड पोटगी कुठल्याही परिस्थितीत टाळता येणार नाही - हायकोर्ट
19
बिबट्याच्या भीतीने शेतात जनावरे चरायला सोडणेही झाले बंद; लोकांच्या राहणीमानात बदल
20
माणसं आली पिंजऱ्यात, बिबट्या मात्र मोकाट! भय इथले संपत नाही, सायंकाळी ६ च्या आत सगळेच घरात
Daily Top 2Weekly Top 5

विरुष्काने शेअर केला हनिमूनचा फोटो, चाहते पुन्हा एकदा फिदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 15:35 IST

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा सध्या रोममध्ये आपला हनिमून साजरा करत आहेत.

रोम - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा सध्या रोममध्ये आपला हनिमून साजरा करत आहेत. इटलीतील बोर्गो फिनोखिएतो रिसॉर्टमध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित विरुष्काचा शाही विवाहसोहळा पार पडला. यानंतर दोघेही हनिमूनसाठी रोमला गेले आहेत. दरम्यान अनुष्काने इन्स्टाग्रामवर विराटसोबतचा फोटो शेअर केला असून चाहत्यांच्या लाईकचा पाऊस पडू लागला आहे. बर्फाळ ठिकाणी उभं राहून काढलेल्या या फोटोत दोघेही रोमॅण्टिक मूडमध्ये दिसत आहेत. सोशल मीडियावर लग्नाच्या फोटोंनी धुमाकूळ घातल्यानंतर आता हा फोटोही व्हायरल होऊ लागला आहे. 

विराट आणि अनुष्काचे कुटुंबिय भारतात परतले आहेत. मुंबई आणि दिल्लीत ग्रॅण्ड रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला असून, कुटुंबिय त्याची तयारी करत आहेत. विरुष्का नेमकं लग्न करणार आहेत की नाहीत याबाबत अनेकांना उत्सुकता होती. अखेर दोघांनी 11 डिसेंबरला सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या लग्नाचा फोटो शेअर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. यानंतर जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. 

मुंबई आणि दिल्लीत जंगी रिसेप्शन विराट कोहली आणि अनुष्का शर्मा 11 डिसेंबरला विवाहबंधनात अडकले. इटलीमधील टस्कनी इथल्या बोर्गो फिनोखिएतो या रिसॉर्टमध्ये विरुष्काचा विवाहसोहळा पार पडला. सध्या विराट आणि अनुष्का रोममध्ये हनिमून साजरा करत आहेत. इकडे त्यांचे कुटुंबिय मात्र रिसेप्शनच्या तयारीत व्यस्त आहेत. विराट आणि अनुष्काच्या लग्नानंतर आता जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यांचं रिसेप्शन कार्डही सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. 21 डिसेंबरला दिल्ली आणि 26 डिसेंबरला बॉलिवूड आणि क्रिकेटर्ससाठी मुंबईत रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. रिसेप्शनला मोठमोठे सेलिब्रेटी आणि क्रिकेटर उपस्थित राहणार आहेत. 

अनुष्काचा बालपणीचा क्रश होता विराट कोहलीअनेकांना असं वाटतंय की, विराट आणि अनुष्काची भेट एका जाहिरातीच्या शुटिंगदरम्यान झाली होती. तुम्हीदेखील असाच विचार करत असाल तर तुमच्याकडे चुकीची माहिती आहे. अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार, दोघेही लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. देहरादूनमध्ये राहत असलेल्या अनुष्काच्या 82 वर्षीय आजी उर्मिला यांनी हा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, दोघे फक्त एकमेकांना ओळखतच नव्हते, तर लहानपणापासून अनुष्काला विराट कोहली आवडत होता. तिचा तो क्रश होता. इतकंच नाही तर दोघे एकमेकांसोबत क्रिकेटही खेळायचे. अनुष्काच्या आजीने सांगितल्यानुसार, अनुष्का जेव्हा लहान होती तेव्हा कोहली त्यांच्या घरी खेळण्यासाठी येत असे. अनुष्काचं संपुर्ण कुटुंब विराट कोहलीला चांगल्या प्रकारे ओळखतं. 

विरुष्का विकणार लग्नाचे फोटोलग्नात फोटो काढण्यामागे विराट आणि अनुष्काचं एक खास कारण होतं. हे सर्व फोटो एका अमेरिकन मॅगजिनला विकण्यात येणार असून, मिळणारे पैसे दान म्हणून देण्यात येणार आहेत. विराट आणि अनुष्काने मिळणा-या पैशातून समाजकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने समाजातून मिळालेलं जमेल तितकं परत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. लवकरच विरुष्काच्या लग्नाचे फोटो एका मॅगजिनच्या माध्यमातून पहायला मिळणार आहेत. हे अमेरिकेतील एक प्रसिद्ध फॅशन मॅगजिन असणार आहे. विरुष्काच्या या निर्णयामुळे चाहते शुभेच्छांनंतर आता कौतुकाचा वर्षाव करत आहेत. 

टॅग्स :Virushkaविरूष्काVirat Kohliविराट कोहलीAnushka Sharmaअनुष्का शर्माVirat Anushka Weddingविराट अनुष्का लग्नVirushka Weddingविरूष्का वेडिंग