शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Video - ...अन् स्ट्रेचरवर असलेल्या रुग्णाला अचानक मारायला लागला डॉक्टर; रुग्णालयात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 20:07 IST

Viral Video : रुग्णालयात डॉक्टरांनी एका रुग्णाला बेदम मारहाण केल्याची अजब घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - ओडिशामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉक्टरांनी रुग्णाला ठीक करण्याऐवजी मारहाण केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशाच्या कालाहांडी जिल्ह्यातील धर्मगड उपविभागीय रुग्णालयात डॉक्टरांनी एका रुग्णाला बेदम मारहाण केल्याची अजब घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. यामध्ये डॉक्टर रुग्णाला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. डॉक्टरांनी रुग्णाला चपलेने मारहाण केल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. 

रुग्णाला लाठ्या-काठ्यांनी देखील बेदम मारहाणही करण्यात आली. त्यानंतर सुरक्षा रक्षकांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. या प्रकरणी स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री दहाच्या सुमारास परिसरातील एक व्यक्ती पोटात प्रचंड दुखत असल्याच्या तक्रारीमुळे उपचारासाठी रुग्णालयात गेला होता. रूग्णालयात गेल्यानंतर तिथे कोणीही डॉक्टर न दिसल्याने त्याने आरडाओरडा सुरू केला. यानंतर रूग्णालयातील डॉक्टर शैलेश कुमार डोरा यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर डॉक्टर डोराने रुग्णाला मारहाण करण्यास सुरुवात केली.

मुकेश नाईक असं या रुग्णाचं नाव आहे. मुकेशने पोटात असह्य दुखू लागल्याने मी रुग्णालयात गेलो तेव्हा माझी काळजी घेण्यासाठी एकही डॉक्टर तेथे उपस्थित नव्हता असा आरोप केला आहे. तसेच मी सुरक्षा रक्षकाला विचारले असता त्याने सांगितले की, डॉक्टर वॉशरूमला गेले आहेत. काही वेळाने वैद्यकीय कर्मचार्‍यांपैकी एकाने इंजेक्शन दिलं. मी स्ट्रेचरवर होतो. त्यावेळी डॉक्टर अचानक माझ्याजवळ आले आणि त्यांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली असं म्हटलं आहे.

रुग्णालयातील डॉक्टरांच्या अशाप्रकारच्या वागण्याचा सर्वांनाच धक्का बसला आहे. डॉक्टरांच्या अटकेच्या मागणीसाठी रुग्ण आणि स्थानिक लोकांनी सोमवारी रास्ता रोकोही केला. डॉक्टर आणि रुग्णाच्या वतीने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल केला असून या घटनेबाबत डॉक्टरांना ताब्यात घेतलं आहे. पुढील तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल