आपल्याकडे एखाद्याच्या घरी सरकारी नोकरी मिळाल्यानंतर आनंद व्यक्त केला जातो. पण, उत्तर प्रदेशमध्ये एका परिवारात पत्नीला सरकारी नोकरी मिळाल्यामुळे मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमधून समोर आली आहे. एका तरुणाने त्याची पत्नी आणि सासरच्या मंडळींवर मानसिक आणि आर्थिक छळ केल्याचा आरोप केला आहे. पत्नी सरकारी नोकरी मिळाल्यानंतर सोडून जाण्याची धमकी देत असून १ कोटी रुपयांची मागणीही करत असल्याचा आरोप तरुणाने केला आहे. या तरुणाने कानपूर पोलीस आयुक्तालयात तक्रार दाखल केली आहे.
वाल्मीक कराडला पोलीस कोठडी सुनावल्यानंतर धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण नौबस्ता येथील हंसपुरमचे आहे. एका खासगी शाळेचे व्यवस्थापक बजरंग भदोरिया यांचे लग्न २२ फेब्रुवारी २०२३ रोजी साहिबाबाद येथील रहिवासी लक्षिता यांच्याशी झाले होते. काही महिन्यांपूर्वी लक्षिताला दिल्लीत सरकारी शिक्षिकेची नोकरी मिळाली. यानंतर, बजरंगच्या सासरचे लोक आले आणि लक्षिताला सोबत घेऊन जाऊ लागले. कारण विचारले असता, तिने सांगितले की ती तिच्या आईवडिलांच्या घरी राहून काम करेल आणि तिला वाटेल तेव्हा सासरच्या घरी येईल.
यावेळी बजरंगच्या कुटुंबाने याचा विरोध केला तेव्हा त्याच्या सासरच्यांनी त्याला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी तिच्या सासरच्या घरी आली आणि काहीच कारण नसताना भांडण करून परत गेली. १२ डिसेंबर रोजी लक्षिता तिचे वडील राम माधव, आई संतोष आणि भाऊ अनिल यांच्यासोबत शाळेत आली आणि भांडू लागली. तसेच १ कोटी रुपयांची मागणी केली, असा आरोप बजरंग यांनी केला आहे.
जीवे मारण्याची धमकीही दिली
१२ डिसेंबर रोजी ती तिच्या शाळेत ड्युटीवर असताना पत्नी, सासू आणि सासरे तिथे आले आणि त्यांनी त्याला वैवाहिक संबंध तोडण्यास सांगितले. तसेच, जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप केला आहे. संपूर्ण घटनेनंतर, तरुणाने नौबस्ता पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रार नोंदवण्यात आली आहे आणि आता लवकरच पत्नी आणि सासरच्या लोकांची या प्रकरणात चौकशी केली जाईल. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत आणि योग्य ती कारवाई केली जाईल.