शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भारीच! फक्त 1 रुपयात 'या' ठिकाणी गरजूंना मिळतात स्टायलिश कपडे; तरुणांनी दिला मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 10:03 IST

Clothes bank sells clothes for 1 rupees to the poor : गरीबांना त्यांच्या आवडीचे कपडे खरेदी करता यावेत, यासाठी एक अनोखं दुकान सुरू करण्यात आलं आहे.

नवी दिल्ली - विविध प्रकारचे रंगीबेरंगी कपडे परिधान करणं सर्वांनाच आवडतं. श्रीमंत मंडळी हवे असलेले कपडे कोणत्याही वेळी आणि कितीही किंमत मोजून विकत घेऊ शकतात. त्यांना हवी तशी फॅशन करू शकतात. मात्र गरीबांसाठी नवीन कपडे घेणं ही गोष्टच थोडी अवघड आहे. त्यांच्यासाठी हे सोपं नसतं. पैसे नसल्याने त्यांना हे शक्य होत नाही. पण हीच गोष्ट लक्षात घेऊन चार मित्रांनी पुढाकार घेतला आहे. गरीबांना त्यांच्या आवडीचे कपडे खरेदी करता यावेत, यासाठी एक अनोखं दुकान सुरू करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या दुकानात कोणतीही वस्तू ही फक्त एका रुपयात विकत मिळते. 

गरीब मुलांना देखील त्यांच्या आवडीचे नवीन कपडे वापरता यावेत, यासाठी चार मित्रांनी एकत्र येत ही अनोखी कल्पना साकारली आहे. बंगळुरूतील इलेक्ट्रॉनिक सिटी  (Electronic City, Bengaluru) परिसरात हे दुकान सुरू करण्यात आलं आहे. इमॅजिन क्लोथ बँक (Imagine Clothes Bank) असं या दुकानाचं नाव आहे. काही वर्षांपूर्वी चार विद्यार्थ्यांना गरीब विद्यार्थ्यांच्या कपड्याविषयी काहीतरी करण्याची कल्पना सुचली. गरीबांना चांगले कपडे घालता यावेत आणि आत्मसन्मानानं राहता यावं, यासाठी हे गरजेचं असल्याचं त्यांना वाटत होतं. 

अवघ्या एका रुपयात वस्तू घेता येतात विकत 

चिमुकल्यांसाठी त्यांनी एक एनजीओ सुरू केली. एनजीओमार्फत हे दुकान सुरू करण्यात आलं असून कुठलीही गरीब व्यक्ती या ठिकाणी येऊन अवघ्या एका रुपयात वस्तू विकत घेऊ शकते. गरीबांचा आत्मसन्मान कायम राहावा आणि आपण काही फुकट घेतलंय, अशी भावना त्यांच्यात निर्माण होऊ नये, यासाठीच एक रुपया घेण्याची कल्पना निश्चित करण्यात आली. या ठिकाणी शर्ट, ट्राऊझर, टॉवेल आणि कुठलीही गोष्ट गरीबांना फक्त एका रुपयांत विकत घेणं शक्य होतं.

इमॅजिन ट्रस्ट नावाने चार मित्रांनी ही संस्था केली सुरू 

2013 साली इमॅजिन ट्रस्ट नावानं चार मित्रांनी ही संस्था सुरू केली. त्यानंतर मेलिशा नावाची एक तरुणी या संस्थेत सहभागी झाली. तिने पुढाकार घेतल्यामुळे संस्थेच्या कामाचा आवाका वाढवला आणि मोठ्या प्रकल्पांना हात घालायला सुरुवात केली. त्यांना मिळणाऱ्या देणग्यांमधून ते उत्तम प्रतिचे कपडे विकत घेतात आणि केवळ एका रुपयात गरीबांना उपलब्ध करून देतात. या कल्पनेचं बंगळुरूसह देशभरात कौतुक होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Indiaभारत