शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

व्हीआयपींना बाजरीची भाकरी, २० देशांचे कूक बनवणार त्यांच्या देशाची आवडती डीश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 08:19 IST

सर्व देशांना त्यांच्या पसंतीचा नाष्टा, दुपारचे भोजन, रात्रीचे भोजन यात लागणाऱ्या खाद्यपदार्थांची यादी मागवण्यात आली आहे

- संजय शर्मा 

नवी दिल्ली : जी-२० संमेलनात विदेशी पाहुण्यांसाठी पहिल्या दिवशी दुपारच्या जेवणात भरडधान्याचे स्वादिष्ट भोजन तयार करण्यात येणार आहे. बाडमेरची प्रसिद्ध हलवाई टीम हे भोजन तयार करणार आहे.

सर्व देशांना त्यांच्या पसंतीचा नाष्टा, दुपारचे भोजन, रात्रीचे भोजन यात लागणाऱ्या खाद्यपदार्थांची यादी मागवण्यात आली आहे व या देशांमध्ये काम केलेले कूक हे पदार्थ तयार करीत आहेत. जी-२० संमेलनात सहभागी होणाऱ्या देशांना ९ सप्टेंबर रोजी दुपारच्या भोजनात पाहुण्या देशांसाठी भरडधान्याचे स्वादिष्ट भोजन तयार केले जात आहे. बाडमेर येथील सुप्रसिद्ध कूकची टीम प्रगती मैदानात व पूसा इन्स्टिट्यूटमध्ये हे भोजन तयार करीत आहे. ज्वारी, बाजरी, नाचणीपासून तयार होणारे पक्वान्न पाहुण्यांना खाऊ घालणार आहेत. 

हॉटेल मौर्या शेरेटनमध्ये अमेरिकी, इटालियन, कॉन्टिनेंटल फूड, ताज पॅलेसमध्ये चायनीज, हयातमध्ये जपानी, ललितमध्ये ऑस्ट्रेलियन, शांग्रिलामध्ये ब्रिटिश भारतीय खाद्यपदार्थ, अशा प्रकारे वेगवेगळ्या देशांच्या आवडीचे खाद्यपदार्थ प्रत्येक हॉटेलमध्ये ठेवले जाणार आहेत. हे तयार करणारे कूकही त्या देशांचे तज्ज्ञ कूक असतील.

‘त्यांच्या’ पत्नींसाठी असा आहे कार्यक्रम...९ सप्टेंबर रोजी सर्व राष्ट्राध्यक्षांच्या पत्नींसाठी दिल्लीच्या पूसा इन्स्टिट्यूटमध्ये अनोखा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यांना भरडधान्याच्या शेतामध्ये सफर घडवून आणली जाईल. त्या भरडधान्य उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना भेटतील व भरडधान्य उत्पादन करण्यातील बारकावेही समजून घेतील. त्यांचे भरडधान्याचे दुपारचे जेवणही पूसा इन्स्टिट्यूटमध्ये आहे. बाडमेर येथील सुप्रसिद्ध कूक टीम हे भोजन करणार आहे. राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी ९ सप्टेंबरला भरडधान्याचे दुपारचे भोजनानंतर मॉडर्न गॅलरी ऑफ आर्ट आणि नॅशनल म्युझियम पाहण्यास जाणार आहेत.

कोणते राष्ट्रप्रमुख कोणत्या हॉटेलमध्ये?अमेरिका राष्ट्राध्यक्ष जो बायडेन : मौर्य शेरेटॉन (दिल्ली)चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग : ताज पॅलेस हॉटेलब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सूनक : शांग्रिला हॉटेलफ्रान्सचे पंतप्रधान इमॅन्यूएल मॅक्रॉन : क्लॅरिजेस हॉटेलसौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान : लीला पॅलेस हॉटेलयूएइचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान : ताजमहाल हॉटेल

टॅग्स :Indiaभारत