शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अयप्पा मंदिरातील महिला प्रवेशाविरोधात केरळमध्ये हिंदू संघटनांचे हिंसक आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 06:10 IST

अय्यप्पा मंदिरात दोन महिलांनी प्रवेश केल्यामुळे संतप्त झालेल्या हिंदू संघटनांनी केरळमध्ये गुरुवारी बंद पाळला. त्याचे राज्यभरात पडसाद उमटले. हिंसाचारात एक ठार तसेच ३८ पोलिसांसह १०० हून अधिक लोक जास्त लोक जखमी झाले.

कोची : अय्यप्पा मंदिरात दोन महिलांनी प्रवेश केल्यामुळे संतप्त झालेल्या हिंदू संघटनांनी केरळमध्ये गुरुवारी बंद पाळला. त्याचे राज्यभरात पडसाद उमटले. हिंसाचारात एक ठार तसेच ३८ पोलिसांसह १०० हून अधिक लोक जास्त लोक जखमी झाले. याशिवाय जबरदस्तीने दुकाने बंद करू पाहणाऱ्या भाजपाच्या ४ कार्यकर्त्यांना अज्ञात इसमांनी भोसकले. हिंसक कारवायातील २५0 जणांना अटक करण्यात आली आहे.हिंदू संघटनांच्या शिखर संस्थेने बंदची हाक दिली होती. या बंदला भाजपने पाठिंबा दिला होता. काँग्रेसनेही काळा दिन पाळला. पंडालम, कोळीकोड, कासारगोडे, ओट्टपलम येथे निदर्शकांनी काही पक्षांच्या कार्यालयावर हल्ले चढविले. त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. कोळीकोड येथे अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या. पल्लकडमध्ये संघ, भाजपच्या मोर्चात पत्रकारांना मारहाण करण्यात आली.महिला भक्त दर्शन घेऊन निघून जाताच मुख्य पुजाºयाने मंदिर शुद्धीकरणासाठी एक तास बंद ठेवले. त्याने न्यायालयाचा अवमान केल्याने अ‍ॅड. दिनेश यांनी आपल्या याचिकेची लवकर सुनावणी घ्यावी, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयास केली. पण त्यास न्यायालयाने नकार दिला. मूळ निर्णयाचा पुनर्विचार करावा यासाठी ४९ याचिका न्यायालयात आल्या असून सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठासमोर २२ जानेवारी रोजी त्यावर सुनावणी होणार आहे.मुख्यमंत्र्यांचा भाजपावर आरोप : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही शबरीमाला प्रश्नाचे राजकारण करून संघ, भाजपा केरळमध्ये अशांतता व हिंसाचार करीत आहे, असा आरोप मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी केला.

टॅग्स :Sabarimala Templeशबरीमला मंदिर