शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगाल, तामिळनाडूमध्ये हिंसाचार, लाठीमार, गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 04:55 IST

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये मतदानाला हिंसाचाराचे गालबोट लागले.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये मतदानाला हिंसाचाराचे गालबोट लागले. एका जमावाने माक्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार मोहम्मद सलिम यांच्या वाहनावर दगडफेक केल्याने त्यांना एका मतदान केंद्रात जाऊन बसावे लागले, तर वाहनचालक घाबरून पळून गेला. त्यानंतर ते वाहन पेटवून देण्यात आले.बंगालमधील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३१ वर चोपरा विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी आधी अश्रुधूर सोडला आणि नंतर हवेत गोळीबारही केला. यात कोणीही जखमी झाले नाही. तेथील एका गावातील मतदार मतदान करण्यासाठी निघाले असता, त्यांना विशिष्ट पक्षाच्या लोकांनी जाण्यापासून अडवले आणि परत घरी जाण्यास सांगितले. त्यामुळे संतापलेल्या लोकांनी रस्ता अडवून ठेवला. त्यांना पांगवण्याचा प्रयत्न पोलीस करीत असताना, त्यांच्यावर काही मंडळींनी क्रूड बॉम्बही फेकले. त्यामुळे स्वसंरक्षणासाठी आणि जमावाला हटवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला.तरीही जमाव जाण्यास तयार नसल्याचे लक्षात येताच, पोलिसांनी हवेत गोळीबार केला आणि शीघ्र कृती दलालाही पाचारण केले. त्यानंतर मात्र तो जमाव निघून गेला. रायगंज मतदारसंघाच्या क्षेत्रात एका जमावाने स्थानिक वृत्तवाहिनीच्या पत्रकारालाही मारहाण केली. पोलीस तिथे लगेच पोहोचले. त्यामुळे पत्रकाराची सुटका झाली. मात्र त्याला फार मारलागला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.जम्मू-काश्मीरमधील उधमपूर व श्रीनगर मतदारसंघांमध्येही आज मतदान झाले. उधमपूरमध्ये ६५ टक्क्यांहून अधिक मतदारांनी आपला हक्क बजावला. श्रीनगरमध्ये मात्र सुमारे १६ टक्के मतदान झाल्याचे वृत्त आहे. तिथे सकाळपासूनच अतिशय संथ गतीने मतदान सुरू होते. सकाळी ११ वाजेपर्यंत जेमतेम २ ते ३ टक्केच मतदान झाले होते. सकाळी महिला मतदारच प्रामुख्याने मतदानासाठी बाहेर पडल्याचे दिसत होते. मतदानाच्या काळात काश्मीर खोºयात हिंसाचार मात्र झाला नाही.>कार्यकर्ते भिडलेतामिळनाडूच्या वेल्लोर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रद्द केली असली तरी तेथील अंबुर व गुडियातम विधानसभा मतदारसंघात मतदान झाले. या दोन्ही ठिकाणी अण्णा द्रमुक व एएमएमकेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. त्यामुळे पोलिसांना लाठीमार करून त्या जमावाला पांगवावे लागले. तिथे निमलष्करी दलांना हवेत गोळीबार करावा लागल्याचे सांगण्यात आले. त्याआधी सकाळी अण्णाद्रमुकवर बुथ बळकावून खोटे मतदान केल्याचा आरोप द्रमुकचे सरचिटणीस एम. के. स्टॅलिन यांनी केला होता. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी याचा इन्कार केला. कुठेही बुथ बळकावण्याचे प्रकार झालेले नाहीत, असे अधिकाºयांनी सांगितले. तामिळनाडूत मतदानाला आलेले तीन वृद्ध मरण पावल्याचे वृत्त आहे.

टॅग्स :West Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMamata Banerjeeममता बॅनर्जी