शहरं
Join us  
Trending Stories
1
आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी; राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी, निवडणुकांची चाचपणी
2
पाकिस्तानच्या थाळीतून टोमॅटो गायब! लाहोर, कराचीत महागाईचा भडका; अफगाणिस्तानने शिकवला 'हा' धडा
3
ट्रम्प-पुतिन भेट रद्द; व्हाईट हाऊसने फेटाळले बुडापेस्ट शिखर परिषदेचे वृत्त
4
आजचे राशीभविष्य : बुधवार २२ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ संभवतो, व्यापारी वर्गाचे गुंतलेले पैसे मिळतील
5
PM मोदींचा स्वदेशी नारा; जनतेला पत्र; ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ बुलंद करण्यासाठी प्रयत्न करा
6
बाधित क्षेत्र ३ हेक्टर मानून मदत; राज्य सरकारचा निर्णय, पूरग्रस्त शेतकऱ्यांना होणार लाभ
7
दीपिका पादुकोण-रणवीर सिंगने पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा; लाडक्या दुआचे खास फोटो केले शेअर
8
अपात्र लाडक्या बहिणींनी उकळले १६४ कोटी रुपये, १२ हजारांवर पुरूष तर अपात्र महिला ७७ हजार
9
मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात ऐन दिवाळीत पावसाचा बार; पुढील तीन दिवस असेच वातावरण राहणार
10
उमेदवार जाहीर होताच महाआघाडीतील दरी स्पष्ट; राजद, काँग्रेस, डाव्या पक्षांनी केले दुहेरी अर्ज
11
बिहार निवडणूक २०२५: १२१ मतदारसंघांत एकूण १,३१४ उमेदवार; महिला मतदारांच्या आधारे ‘जदयु’ बळकट
12
“महाआघाडीला नव्हे, भाजप जनसुराजला घाबरतेय; आमचे उमेदवार फोडतेय”; प्रशांत किशोर यांचा आरोप
13
...तर H1B व्हिसाधारकांना वाढीव शुल्क लागणार नाही; पण वाढ कायम; ट्रम्प प्रशासनाकडून स्पष्टता
14
७ दिवसांत ३३ हजारांनी घसरला दर; लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ८ हजारांनी गडगडली चांदी!
15
सर्व न्यायालयांमधील ‘सू’ व्यवस्था दयनीय; देशातील सर्व हायकोर्टांचा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर
16
विभक्त पती, आईला फ्लॅटमध्ये राहण्यास हायकोर्टाची परवानगी; नेमके प्रकरण काय?
17
नवी मुंबई-पनवेलमध्ये आगीत ६ जणांचा मृत्यू; ठाण्यात एकाच दिवशी आगीच्या सहा घटना
18
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
19
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
20
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती

ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार, रात्री उशिरा मोठ्या कारवाईची शक्यता; अनेक शेतकरी नेते भूमिगत

By बाळकृष्ण परब | Updated: January 26, 2021 23:57 IST

Violence at tractor rally Update : शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनानंतर सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये आहे. या हिंसाचाराची दखल गृहमंत्रालयाने घेतली असून, रात्री उशिरा मोठ्या कारवाईची शक्यता आहे.

नवी दिल्ली - केंद्र सरकाराने पारित केलेल्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीत मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. काही आंदोलकांनी थेट लाल किल्ल्यापर्यंत धडक देत तेथील ध्वजस्तंभावर धार्मिक ध्वज फडकवला होता. दरम्यान, या हिंसक आंदोलनानंतर सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये आहे. या हिंसाचाराची दखल गृहमंत्रालयाने घेतली असून, रात्री उशिरा मोठ्या कारवाईची शक्यता आहे.ट्रॅक्टर परेडमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर केंद्रीय गृहसचिवांनी गृहमंत्री अमित शाह यांना दिल्लीतील परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून रात्री उशिरा मोठी कारवाई करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. या हिंसक आंदोलनानंतर अनेक शेतकरी नेते रडारवर असून, सिंघू बॉर्डरवरसुद्धा ट्रॅक्टर मोर्चानंतर अनेक प्रमुख शेतकरी नेते दिसून आळेले नाहीत.दिल्ली पोलिसांनीही शेतकऱ्यांनी केलेले आंदोलन हे उग्र आणि हिंसक असल्याचे म्हटले आहे. तसेच काही अधिकाऱ्यांसह सुमारे ८३ पोलीस या हिंसाचारात जखमी झाल्याचे म्हटले आहे.दरम्यान, परिस्थितीचे गांभीर्य विचारात घेऊन केंद्र सरकारने खबरदारी म्हणून निमलष्करी दल तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय राजधानीच्या क्षेत्रात शांतता कायम राखण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त केंद्रीय बलांची तैनाती करण्यात येणार आहे. तर दिल्ली नजिकच्या हरियाणामधील अनेक जिल्ह्यांमध्ये इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद करण्याचा कालावधी वाढवण्यात आला आहे. सरकारने दिलेल्या आदेशांनुसार सोनीपत, पलवल आणि झज्जर जिल्ह्यांमध्ये अफवांना रोखण्यासाठी बुधवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत इंटरनेट आणि एसएमएस सेवांना स्थगिती दिली जाईल.

टॅग्स :Farmerशेतकरीdelhiदिल्लीCentral Governmentकेंद्र सरकार