शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

धर्माच्या नावाने हिंसाचार कदापि चालू देणार नाही, पंतप्रधान मोदींनी दिला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 6:51 AM

नवी दिल्ली : धर्माच्या नावाने हिंसाचार बिलकूल खपवून घेतला जाणार नाही. कायदा हाती घेणाºयांची गय केली जाणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांना हरियाणा येथील पंचकुला येथील न्यायालयाने आश्रमातील एका महिला साध्वीवर बलात्कार केल्याच्या खटल्यात दोषी ठरविल्यानंतर त्या पंथाच्या अनुयायांनी ...

नवी दिल्ली : धर्माच्या नावाने हिंसाचार बिलकूल खपवून घेतला जाणार नाही. कायदा हाती घेणाºयांची गय केली जाणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांना हरियाणा येथील पंचकुला येथील न्यायालयाने आश्रमातील एका महिला साध्वीवर बलात्कार केल्याच्या खटल्यात दोषी ठरविल्यानंतर त्या पंथाच्या अनुयायांनी केलेल्या हिंसाचारात ३६ जण ठार झाले होते. त्यानंतर पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने ‘पंतप्रधान भाजपाचे नव्हेत तर देशाचे आहेत व मुख्यमंत्रीही पक्षाचे नसून हरियाणा राज्याचे आहेत,’ असे जळजळीत भाष्य केले होते.मोदी यांनी ३५ व्या ‘मन की बात’मध्ये याची विशेष दखल घेऊन वरीलप्रमाणे ग्वाही दिली. प्रत्येकाला कायद्यापुढे झुकावेच लागेल. दोषी कोण हे कायदा ठरवेल व जे कोणी दोषी ठरेल त्याला शिक्षा अवश्य होईल, असे त्यांनी सांगितले.तयार भाषणात सुधारणा?पंचकुला येथील हिंसाचार शुक्रवार दुपारनंतर झाला. त्यावर पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांवर उच्च न्यायालयाने शनिवारी ताशेरे ओढले. माहीतगार सूत्रांनुसार तोपर्यंत मोदींच्या ‘मन की बात’चे रेकॉर्डिंंग झालेले होते. प्रसारणापूर्वी तातडीने पुन्हा रेकॉर्डिंग करून हरियाणातील घटनांचा संदर्भ व त्याचा धिक्कार करणारा पहिला परिच्छेद नव्याने समाविष्ट केला गेला.अहिंसा परमो धर्म:भिन्न धर्मांचे उत्सव सुरू असताना देशाच्या एका भागातून हिंसाचाराच्या येणाºया बातम्या हा देशासाठी साहजिकच चिंतेचा विषय आहे, असे नमूद करून मोदी म्हणाले की, पूर्वजांनी शेकडो वर्षे सार्वजनिक जीवनमूल्यांचा व अहिंसेचा आदरपूर्वक स्वीकार केला. तो विचार आपल्या नसानसांत भिनलेला आहे. ‘अहिंसा परमो धर्म:’हे आपण ऐकत, सांगत आलो आहोत.कायदा हाती घेऊ नकास्वातंत्र्य दिनाच्या भाषणाचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, श्रद्धेच्या नावाने हिंसा सहन केली जाणार नाही, हे मी त्याही वेळी सांगितले होते. मग ती श्रद्धा धर्माविषयी असो, राजकीय विचारसरणीची असो, व्यक्तीसंबंधी किंवा परंपरांविषयी आस्था असो. श्रद्धेच्या नावाखाली कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही व तसे कोेणालाही करू दिले जाणार नाही.