शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरमधील हिंसा थांबेना शाळेबाहेर महिलेची हत्या; पुन्हा एकदा इंटरनेटवर घातली बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 08:00 IST

इन्फाळ : मणिपूरमधील हिंसाचार ६० दिवसांनंतरही थांबण्याचे नाव घेताना दिसून येत नाही. बुधवारी प्रशासनाने शाळा सुरू केल्यानंतर गुरुवारी इन्फाळच्या ...

इन्फाळ : मणिपूरमधील हिंसाचार ६० दिवसांनंतरही थांबण्याचे नाव घेताना दिसून येत नाही. बुधवारी प्रशासनाने शाळा सुरू केल्यानंतर गुरुवारी इन्फाळच्या पश्चिम जिल्ह्यात गुरुवारी एका शाळेबाहेर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी एका महिलेची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर परिस्थिती बिघडल्यामुळे पुन्हा एकदा इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे.

ही घटना लम्फेल पोलिस स्टेशन अंतर्गत क्वाकिथेल मायाई कोईबी येथे घडली. हत्येच्या घटनेनंतर जवळपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात तणव निर्माण झाला होता. अतिरिक्त सुरक्षा दल या भागात पोहोचू नये म्हणून सुमारे १ हजार ते १,५०० महिलांनी रस्ते रोखून धरले होते. मात्र, परिसरात आसाम रायफल्सच्या जवानांच्या तैनातीमुळे परिस्थिती नियंत्रणात आली.

सर्व जण ‘योद्धा’च्या पोशाखात चुराचांदपूरमध्ये मोठ्या संख्येने कुकी समुदायाच्या लोकांनी आंदोलन केले. त्यांनी शांती मैदानापर्यंत रॅली काढली. यामध्ये जवळपास ४ हजार लोक सहभागी झाले होते. यातील बहुतेक सर्व जण ‘योद्धा’च्या पोशाखात होते. तसेच कमांडोप्रमाणे चेहरा रंगवला होता. 

विरोधी सदस्यांचा बैठकीतून सभात्यागमणिपूरवर चर्चेची मागणी संसदेच्या गृह व्यवहारविषयक स्थायी समितीच्या अध्यक्षांनी फेटाळल्यानंतर विरोधी सदस्य बैठकीतून बाहेर पडले. ही सरकारची नैतिक आणि घटनात्मक जबाबदारी असल्याचे सदस्य म्हणाले.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार